शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील बिल्डर सुरज परमार आत्महत्याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. तसेच परमार आत्महत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली. “ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत,” असं सूचक वक्तव्य करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ते रविवारी (२५ डिसेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “आमचे खासदार अरविंद सावंत यांनी एक विषय मांडला. ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. लावा त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि भाजपा त्यांना पाठीशी घालत आहे. लावा चौकशी, करा एसआयटी.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

“सुरज परमार यांच्या डायरीवर एसआयटी स्थापन करा”

“राज्यपालांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अपमानाच्या वक्तव्यांची एक मालिकाच चालवली आहे. असं होऊनही भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावर बसून आहेत आणि भाजपा त्यांचं भजन गात आहे. हा काय प्रकार आहे? एसआयटी यावरच स्थापन झाली पाहिजे. एसआयटी सुरज परमार यांच्या डायरीवर स्थापन झाली पाहिजे.मात्र, ते तसं करत नाहीत. ते विरोधीपक्षांवर एसआयटी लावत आहेत. इतकं सुडबुद्धीने वागणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच आलं नव्हतं,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“जे खोके वाटले आहेत ते वसूल करण्यासाठी हे सरकार…”

संजय राऊत पुढे म्हणाले, “अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले गेले नाहीत. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. हे सरकार केवळ खोके गोळा करण्यासाठी आले आहे. जे खोके वाटले आहेत ते वसूल करण्यासाठी हे सरकार आलं आहे. हे जनतेच्या प्रश्नावर किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नावर सरकार स्थापन झालं नाही. फक्त शिवसेना फोडायची, शिवसेना संपवायची, महाराष्ट्राचा स्वाभिमान नष्ट करायचा याच अजेंड्यावर हे सरकार आलं आहे.”

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यात भाजपाच्या प्रमुख लोकांचा हात”, तीन नेत्यांचा उल्लेख करत संजय राऊतांचा गंभीर आरोप

“…तर उद्धव ठाकरेंचं सरकार गेलंच नसतं”

“सरकार जनतेच्या प्रश्नावर चाललं असतं, तर उद्धव ठाकरेंचं सरकार गेलंच नसतं. ते जनतेच्या प्रश्नावर काम करणारं सरकार होतं,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.

Story img Loader