मागील जवळपास आठ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. न्यायालयातील ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यपाल कोश्यारी यांची बाजू मांडताना तुषार मेहता यांची अनेकदा गडबड आणि तारांबळ झाली. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही त्यांना देता आली नाहीत. यावेळी न्यायालयात नेमकं काय घडलं? याबाबतचा सर्व घटनाक्रम कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितला आहे.

हेही वाचा- ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्याचा शिंदे गटात प्रवेश

‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना असीम सरोदे म्हणाले, “तुषार मेहता यांच्या बुद्धीमत्तेबद्दल मला आदर आहे. पण प्रकरणात त्यांनी आवश्यकता नसताना खूप जास्त बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोलण्याचा स्कोप नसतानाही ते पोटतिडकीने राज्यपालांची बाजू मांडत होते. कदाचित कुणीतरी त्यांना असाच युक्तिवाद करायचा, असं सांगितलं असावं. त्यामुळे जे खोटं आणि घटनाबाह्य वागले आहेत. ज्यांनी अनेकदा असंविधानिक नैतिकता अस्तित्वात आणली. असे महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू मांडताना, तुषार मेहता यांची गडबड आणि तारांबळ उडाल्याचं न्यायालयात पाहायला मिळालं.”

हेही वाचा- “देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो”; NCPच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देताच उद्धव ठाकरे म्हणाले, “आधी गावपातळीवर…”

“जेव्हा न्यायाधीशांनी तुषार मेहता यांना प्रश्न विचारले, तेव्हा त्यांना उत्तरं देता येत नव्हती. बाजुला विरोधी पक्षासह त्यांच्या बाजुचे वकीलही झोपले होते. हे पाहून तुषार मेहता स्वत: म्हणाले, ‘मला दिसतंय की सगळ्यांना कंटाळा येत असेल पण माझ्याकडे उपाय नाही. मला हे वाचून दाखवावंच लागेल.’ मेहतांचं हे विधान फार महत्त्वाचं आहे. अशावेळी मला वाटतं की, आपण नेमकेपणाने युक्तिवाद करू शकत नाही. कारण आपली बाजू कमजोर असते. अशावेळी आपल्याला खूप जास्त वाचन करावं लागतं, हेच तुषार मेहतांबरोबर दुर्दैवाने आज न्यायालयात झालं,” अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena political dispute hearing in supreme court tushar mehata governor bhagat singh koshyari asim sarode rmm