शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीचं जोरदार कौतुक केलं. रविवारी (२१ ऑगस्ट) औरंगाबादमध्ये आपल्या मतदारसंघात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपाचे मंत्री अतुल सावे यांनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी रुपये आणल्याचं वक्तव्य केलं. तसेच सावेंनी कामाचं पत्र दिलं की एकनाथ शिंदेही लगेच स्वाक्षरी करायचं असं नमूद केलं.

संजय शिरसाट म्हणाले, “मी अतुल सावे यांना सांगतो की आज तुम्ही मंत्री आहात. त्याचा शहराला किती उपयोग होईल हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. दर आठवड्याला, १५ दिवसांनी एक बैठक आणि झालेल्या कामाचा आढावा घेण्याचं काम आपलं असलं पाहिजे. अतुल सावे शहराचे नागरिक आहेत. ते महाराष्ट्राचे मंत्री असले तरी, या शहराचे नागरिक आहेत. त्यामुळे बोलावलेल्या प्रत्येक माणसाच्या घरी जाणं देखील त्याचं काम आहे. ते सर्व मंत्र्यांनीही केलं पाहिजे, अशी माझी भावना आहे.”

Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Income Tax raid on BJP MLA Harvansh Singh Rathore
भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
Land grabbing by Dhananjay Munde supporters Sarangi Mahajan complains to the Chief Minister Mumbai news
धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून जमीन हडप; सारंगी महाजन यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
mahayuti , Municipal Elections, leaders MNS ,
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत सामील व्हा, मनसेच्या बैठकीत प्रमुख नेते मंडळींचा सूर
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन

“अतुल सावेंनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी रुपये आणले”

“या ठिकाणी निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही. आम्ही मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलो होतो. त्या माणसाची काम करण्याची पद्धत अतुल सावेंनी देखील पाहिली आहे. कितीही पत्रं आणा, तातडीने मान्यता देतात. मी सातारा देवळाईमध्ये जवळपास ७०-८० कोटी रुपयांची कामं केली आहेत. अतुल सावेंनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी रुपये आणले आहेत. सावेंनी कामाचं पत्र दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी लगेच स्वाक्षरी केली होती,” असं शिरसाटांनी सांगितलं.

हेही वाचा : VIDEO: “मागून आले काय, मंत्री झाले काय…”, भाजपा मंत्र्यासमोरच आमदार संजय शिरसाटांनी बोलून दाखवली नाराजी

“काही नसताना मी सगळ्या महाराष्ट्रात टीव्हीवर दिसतो”

संजय शिरसाट पुढे म्हणाले, “माझ्या गल्लीत कचरा उचलला जातो की नाही, माझ्या परिसरात लाईट लागल्या की नाहीत अशा मुलभूत गरजा नागरिकांच्या आहेत. हा त्याला शिव्या देतो, तो याला शिव्या देतो. मला तर खूप कंटाळा येतो. मी तर काही नसताना सगळ्या महाराष्ट्रात टीव्हीवर दिसतो.”

“एकमेकांची चेष्टा करून कधीही तुमचं महत्त्व वाढत नाही”

“एकमेकांची चेष्टा करून किंवा एकमेकांविरोधात बोलून कधीही तुमचं महत्त्व वाढत नाही हे लक्षात ठेवा. तुमचं महत्त्व वाढवायचं असेल तर त्याला कामाची जोड असली पाहिजे. मी केलेला रस्ता म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या मतदारसंघासाठी काय केलं याला महत्त्व असलं पाहिजे,” असंही शिरसाटांनी नमूद केलं.

हेही वाचा : “आम्ही नुकतीच ५० थरांची दहीहंडी फोडली”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले…

“उगाच माझ्याविरोधात कुणाला जमा करू नका”

भाजपा नेत्यांसमोर बोलताना शिरसाट म्हणाले, “राजेंद्र जंजाळ म्हणाले आज मंचावर भाजपा आणि शिवसेनाही दिसते. निवडणुकीत देखील तसेच राहा. शितोळेंनाही सांगतो तसेच राहा. उगाच माझ्याविरोधात कुणाला जमा करू नका. आपल्याला ज्यांच्यासोबत लढायचं आहे ते बाकीचे लोकं आहेत. त्यांच्याशी आपण लढू. परंतु, एकजुट असली पाहिजे. आपलं एक महत्त्व असलं पाहिजे.”

व्हिडीओ पाहा :

“यांच्यातच फाटाफुट दिसते असं त्यांना वाटायला नको”

“नागरिकांमध्ये आपल्याविषयी संभ्रम निर्माण व्हायला नको. यांच्यातच फाटाफुट दिसते असं त्यांना वाटायला नको. म्हणून आज भाजपा-शिवसेनेचे नेते एकत्र आले. यामुळे शहरात एक वेगळा संदेश जाणार आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Story img Loader