एकीकडे राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून वातावरण तापलेलं असतानाच आता विधानपरिषद निवडणुकांसाठी देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलं आहे. लवकरच शिवसेनेकडून या दोन नावांची अधिकृत घोषणा होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेनेनं आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलेलं असताना विधानपरिषद निवडणुकीसाठी देखील उमेदवार निवड निश्चित करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात विधानपरिषदेची एक जागा भाजपासाठी सोडण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आला होता. मात्र, ही चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभा निवडणुका होणार असल्याचं निश्चित झालं. त्यापाठोपाठ विधानपरिषद निवडणुकांसाठी आता शिवसेनेकडून नावं निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे.

Maharashtra Breaking News Live: प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणाचे पडसाद, राज्यसभा निवडणुकीची चुरस; क्षणोक्षणीचे अपडेट्स एकाच क्लिकवर

कोणत्या नावांवर शिवसेनेकडून शिक्कामोर्तब?

२०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पाणी सोडणारे सचिन अहिर यांचं नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या माध्यमातून सचिन अहिर यांचं शिवसेनेकडून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा देखील अंदाज बांधला जात आहे.

“मुख्यमंत्री औरंगाबादला आमदार विकत घ्यायला…”, किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

आमशा पाडवी यांना संधी?

दुसरीकडे सचिन अहिर यांच्यासोबत धडगाव अक्कलकुवा मतदारसंघातील शिवसेना नेते आमशा पाडवी यांच्या नावावर शिवसेनेनं शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जात आहे. २०१९मध्ये पाडवी यांना याच मतदारसंघात काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांच्याकडून अवघ्या २ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे राज्यसभा आणि विधानपरिषद या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे कोल्हापुरातून संजय पवार आणि अक्कलकुवातून आमशा पाडवी अशा स्थानिक नेतृत्वाला शिवसेनेकडून संधी देण्यात आल्याचं दिसून येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sachin ahir amsha padvi mlc election vidhan parishad seat pmw
Show comments