शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. यानंतर संतोष बांगर आक्रमक झाले असून मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. संतोष बागर शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आज समर्थकांसह मुंबईसाठी रवाना होणार आहेत. दरम्यान एबीपी माझाशी बोलताना त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवू शकत नाही असं संतोष बांगर म्हणाले आहेत.

“आदल्या दिवशी रडणारे आमदार गेले, अशा लोकांना…”; संजय राऊतांचा संतोष बांगर यांच्यावर निशाणा

What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

“मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाली होती. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी प्रसारमाध्यमांमध्ये मला पदावरुन हटवण्यात आल्याचं पाहिलं. पण मी पदावरुन हटलेलो नाही. मी आजही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि उद्याही राहणार”, असं संतोष बांगर म्हणाले आहेत.

आधी रडले, मग शिंदे गटात सामील, अचानक निर्णय का बदलला? शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर म्हणाले…

“कोणीतरी उद्धव ठाकरेंची दिशाभूल करत आहे.” असा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला उद्धव ठाकरेंना इतकंच सांगायचं आहे की, दिशाभूल करणाऱ्यांना बाजूला करा. गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. आपण खरंच चांगले नेते आहात”.

“आम्ही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला मतदान केलं असून कोणतीही चूक केलेली नाही. किमान १२ खासदार आमच्या मुख्यमंत्र्यांकडे येणार आहेत. ५० पेक्षा जास्त जिल्हाप्रमुखांच्या मी संपर्कात असून त्यांनी आम्ही तुमच्या बाजूने असल्याचं सांगितलं आहे. अनेक तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखदेखील संपर्कात आहेत. याशिवाय शिवसैनिक, शाखा प्रमुख यांनाही भाजपासोबतची नैसर्गिक युती मान्य आहे,” असा दावा संतोष बांगर यांनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती विभद्र होती असंही ते म्हणाले. आम्ही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला मतदान केलं असून बंडखोर नाही असंही त्यांनी सांगितलं.

“उद्धव ठाकरेंच्या मनात आजही माझ्याबद्दल आदर असणार. मातोश्री माझ्यासाठी सर्वस्व असून आजही मी आदर करतो. पण आजुबाजूचे काही लोक त्यांची दिशाभूल करत आहेत. खरी माहिती लपवून ते खोटी माहिती देतात,” असा आरोप संतोष बांगर यांनी केला.

Story img Loader