विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना या निवडणुकांमधून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्षभरापासून एकनाथ शिंदेंसोबत जो प्रकार सुरु होता, त्यामुळे त्यांचा संताप झाला होता. जाताना एकनाथ शिंदे कमीत कमी एक तास रडत असल्याचं आम्ही पाहिलं असा खुलासा शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

“वयाची ४० वर्ष पक्षासाठी देणारी व्यक्ती ढसाढसा रडत असेल तर सर्वसामान्य आमदारांचं काय? असा प्रश्न आम्हाला सतावत होता. तिथे गेल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं, हा सगळा कठोर निर्णय घेताना त्यांना खूप वेदना होत होत्या. पण माघार घेणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं,” असंही संजय गायकवाड यांनी सांगितलं आहे.

“महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्यासाठी शिवसेना संपवायची आहे,” संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “भाजपाला अजून ४० भोंगे…”

“आमचा मुंबई ते सूरत प्रवास हा आश्चर्यकारक आणि धक्कादायक होता. आम्ही कुठे चालला आहोत याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. एकनाथ शिंदे आम्हाला बाहेर भेटतील असा निरोप होता. पण थेट सूरतला गेल्यावर एकनाथ शिंदे आम्हाला भेटले. गुजरातमध्ये पोहोचल्यावर अचानकपणे ३०-३५ आमदार तिथे होते. अंगावरच्या कपड्यांमध्येच आम्ही गेलो होतो,” अशी माहिती संजय गायकवाड यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्यास सांगितलं तर जाणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

“सूरतनंतर आम्ही सगळे गुवाहाटीला गेलो. नंतर तिथे इतर आमदार आले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला, शिवसेना वाचवायची आहे, शिवसेना पुढे न्यायची आहे अशी चर्चा इथे झाली. आपण काहीही करा, पण आघाडी तोडा, आम्ही परत येण्यास तयार आहोत अस संदेश आम्ही मातोश्रीला देत होतो. मिलिंद नार्वेकर आले असता त्यांनाही हेच सांगण्यात आलं,” असंही संजय गायकवाड यांनी सांगितलं.

“आम्ही बाहेर पडल्यानंतर आमच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आमचं ऑफिस फोडण्यात आले. संजय राऊत यांनी आमच्यावर आक्षेपार्ह टीका केली, त्यामुळे आमदार आणखी चिडले. तुम्ही मुख्यमंत्रीपद, वर्षा सगळं सोडायला तयार होतात, पण काँग्रेस, राष्ट्रवादी सोडायला तयार नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“अडीच वर्षात मला एकदाही मातोश्री किंवा वर्षावर माझं काही काम घेऊन जाता आलं नाही. पक्षाची बैठक सोडली तर अडीच वर्षात कोणतंही पत्र प्रत्यक्ष देता आलं नाही. मंत्रालयातही भेटता आले नाही,” असं संजय गायकवाड यांनी सांगितलं आहे.

“जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…”, दीपक केसरकर यांचं मोठं विधान

“राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला संपवायला निघाले असताना आमचे नेते त्यांच्यासोबत बसले होते. आम्हाला आमचं राजकीय जीवन अंधारात दिसत असताल्याने आम्ही निर्णय घेतला,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“आम्ही निवडून येतो ते १०० टक्के पक्षावर नाही. आमची स्वतःची देखील मतं असतात. आमचं बंड नाही आमचा उठाव आहे. आम्ही शिवसेनेत आहोत, आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही. आम्हाला कोणालाही मंत्रीपदाची आणि पैशाची अपेक्षा नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा मोठा आनंद आम्हाला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणजे आम्ही मुख्यमंत्री,” असंही ते म्हणाले आहेत.

Story img Loader