राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्याचा पुढचा अंक आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या निमित्ताने दिसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटावर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यासंदर्भात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आजच्या सुनावणीसंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यासोबतच, त्यांनी बंडखोर आमदारांच्या गटाला खोचक शब्दांत टोला देखील लगावला आहे.

“सुनावणीतून आम्हाला अपेक्षा आहे की…”

“आज निर्णय येण्याची शक्यता मला वाटत नाही. आम्हाला अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल. लोकशाहीची इतक्या उघडपणे हत्या कुणी करू शकणार नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. कायदा आणि घटनेची पायमल्ली करून फुटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न होतोय. पक्षांतरबंदी कायद्याचं पालन केलं जात नाहीये. म्हणून आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. देशाच्या लोकशाहीला एकमेव आशेचं किरण आता सर्वोच्च न्यायालय आहे”, असं राऊत म्हणाले.

‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Narendra Modi Visits Chief Justice DY Chandrachud House for Ganeshotsav
Narendra Modi : “इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्सवाला विरोध”, सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून टीकेला मोदींचं प्रत्युत्तर
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
Exploding notes in Anand Ashram Dighe confidant Nandkumar Gorule was enraged
आनंद आश्रमात नोटांची उधळण, दिघे साहेबांचे विश्वासू नंदू गोरूले संतापले, म्हणाले…

शिंदे गट की उद्धव ठाकरे, खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष

दरम्यान, संसदेच्या तिसऱ्या माळ्यावरील शिवसेनेच्या कार्यालयावर बंडखोर खासदारांच्या गटानं दावा सांगितल्यानंतर त्यावर संजय राऊतांनी टोला लगावला आहे. “फुटीर गट चंद्रावर देखील कार्यालय स्थापन करतील एवढे हवेत आहेत. त्यांना शिवसेना भवन, मातोश्री, सामनाचा ताबा हवाय. एक दिवस ते जो बायडनचं घरही ताब्यात घेतील. कारण एवढा मोठा पक्ष आहे त्यांचा. बाळासाहेबांचा मूळ पक्ष हा आमचाच आहे किंबहुना बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणलंय, उद्धव ठाकरेंना आम्हीच पक्षप्रमुख केलं असं सांगायलाही हे कमी करणार नाही. महाराष्ट्रात जे चित्र दिसतंय, त्यात काहीही होऊ शकतं”, असं यावेळी राऊत म्हणाले.

“भाजपामध्ये आता मूळच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा अशा…”; १२ खासदारांनी शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेची आगपाखड

“हिंदुत्व तर तोंडी लावायला आहे”

“त्यांना जे काही करायचं ते करू द्या. काल १२ खासदारांचा फुटीर गट भाजपाच्या प्रेरणेनं आम्हाला सोडून गेला. ते कालपर्यंत आमचे सहकारी होते. आजही मी त्यांना सहकारी मानतो. त्यांनी कोणत्या मजबुरीतून आम्हाला सोडलं हे मला माहिती आहे. त्यामागे राजकीय कारण अजिबात नाही. प्रत्येकाची वेगळी मजबुरी आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. बाकी हिंदुत्व तोंडी लावायला आहे”, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.