महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते भ्रष्टाचारात अडकले असून जनतेचा आघाडी सरकारमधील नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. चार राज्यात यश मिळाले. आता मिशन महाराष्ट्र आहे. २०२४ मध्ये राज्यात स्वबळावर भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांकडून भाजपाचं कौतुक; नेत्यांना म्हणाले “प्रतिस्पर्धी असले तरी त्यांच्यांकडून…”

marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या…”, या वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव; म्हणाले, “मी गंमतीने…”

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदा बहुमतापर्यंत मजल मारली. या विजयाचे शिल्पकार फडणवीस यांचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन होताच त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गोव्यात यश मिळाल्याने महाराष्ट्रातील जनतेचा भाजपावर विश्वास बसला आहे. वर्तमान राज्य सरकार हे घोटाळाबाजांचे सरकार आहे. रोज नवनवीन घोटाळे आणि गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत असल्याने सरकार कोंडीत सापडले आहे. माझ्याकडे आघाडीतील आणखी काही नेत्यांच्या विरोधात पुरावे आहेत. योग्य वेळी ते बाहेर काढण्यात येतील. गोव्यातील यशानंतर आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पुढे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

राऊत काय म्हणाले?

“फार चांगली गोष्ट आहे. गोवा जिंकून आल्यापासून त्यांचं मनोबल वाढलं आहे. गोवा काय आहे हे त्यांना लवकरच कळेल. गोवा पोर्तुगीज आणि इंग्रजांनाही कळला नाही. अनेक राजकीय पक्षांनाही गोवा काय आहे आणि गोव्याचं राजकारण कळलं नाही. गोवा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत. राजकीय कार्यात त्यांनी स्वत:ला वाहून घ्यावं,” असं संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊतांचा भाजपाला इशारा; म्हणाले “महाराष्ट्रातही खूप खड्डे खणलेत; आम्ही जर शिमगा केला…”

दरम्यान शऱद पवारांनी मी भाजपाला २०२४ मध्ये राज्यात येऊ देणार नाही असं म्हटलं आहे. त्यासंबंधी बोलताना राऊत म्हणाले की, “भाजपाला कोणीही घाबरत नाही. जर भाजपा केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप, चिखलफेक करुन महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, नेते यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं आहे, असं होणार नाही. शरद पवार यांनी जो विश्वास दिला आहे की, घाबरु नका मी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीच्या वतीनेही त्यांनी भूमिका मांडली आहे”.

महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले “ज्या क्षणी…”

“भाजपातील आमचे मित्र रोज नव्या तारखा देत रंग उधळत आहेत. हे सर्व नकली रंग असून त्यावर केंद्र सरकारचीही बंदी आहे. त्यांना शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. काही झालं तरी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही. लोकशाही आणि राजकारणात प्रयत्न करायला काही हरकत नाही, त्यांनी प्रयत्न करत राहिलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “रेड हा त्यांचा आवडता रंग आहे म्हणण्यापेक्षा यात भेसळ आहे. हे भेसळीचे रंग वापरतात. तुमच्या भेसळीच्या रंगाला आम्ही घाबरत नाही. होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोज सुरु आहे. आम्ही जर शिमगा करायला सुरुवात केला तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खणले आहेत आणि त्यात कोण पडेल, कोणाला ढकललं जाईल हे दिसेल”.

“शिवसेना मोठा पक्ष आहे, शिवसेनेचं आव्हान आहे. ज्याचं आव्हान असतं त्याच्याविरोधात बोंहब मारली जाते. भाजपाच्या दंडात ताकद आहे असं त्यांना वाटत असतं. पण तसं नाही कारण ते पाठीमागून वार करतात. राजकारणात पाठीमागून होणारे हल्ले पचवायचे असतात आणि आम्ही ते पचवत आहोत. ठाकरे सरकारला अडीच वर्ष झाली असून अजून अडीच जातील आणि पुढील पाच वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार,” असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला.

Story img Loader