राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान सोमवारी निवडणूक आयोगाने आणखी एक मोठा निर्णय घेतला. शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केलं आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावासाठी मान्यता देण्यात आली आहे. यानंतर दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया उमटत असून संजय राऊत यांनीही त्यावर भाष्य केलं आहे.

पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केलेले संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन अर्जावरील सुनावणीसाठी न्यायालयात आले असता संजय राऊत यांनी शिवसेना चिन्ह आणि नाव गोठवण्याबाबत मत व्यक्त केलं. शिवसेनेचे नवे चिन्ह कदाचित क्रांती घडवेल असं प्रतिपादन संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
maharashtra assembly election 2024 Congress High Command started efforts for the return of the rebels in gondia
‘हायकमांड’चा आदेश अन् गोंदियातील काही बंडखोर नरमले, तर काही ठाम
Pune Crime Unsafe City Pune City Issues Education Assembly Election 2024
लोकजागर : ‘पुण्य’कीर्तीचे पतन
Arvind Sawant
Arvind Sawant Apologise : गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांनी व्यक्त केली दिलगिरी, पण ‘या’ नेत्यांची नावे घेत म्हणाले…
Eknath Shinde on Mahim
Eknath Shinde : माहीममध्ये महायुतीचा पाठिंबा कोणाला? सदा सरवणकरांना समर्थन की मनसेला साथ? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
chief justice of India Dhananjay Y Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ

“आमच्यात शिवसेनेचे रक्त आहे. याआधी जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही. नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. आम्हीही मोठे होऊ,” असं संजय राऊतांनी सांगितलं. खऱी शिवसेना कोणती हे लोकांना ठाऊक आहे असंही ते म्हणाले.

ठाकरे गटाला मशाल ! ; आयोगाकडून ‘शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावास मान्यता

ठाकरे गटाच्या पक्षाच्या नावाासठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते. मात्र, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हा पक्षनावाचा पर्याय शिंदे गटानेही दिला होता. दोन्ही गटांकडून एकाच नावाचा आग्रह धरला गेल्याने हे पक्षनाव कोणत्याही गटाला न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आणि ठाकरे गटाच्या दुसऱ्या पर्यायाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आता ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावाने ओळखला जाईल.

ठाकरे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्हांचे तीन पर्याय दिले होते. मात्र, हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नव्हते. ‘त्रिशूळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असून, शिंदे गटानेही याच चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे हे चिन्ह दोन्हीही गटांना नाकारण्यात आले. ‘उगवता सूर्य’ हे ‘द्रमूक’ पक्षाचे चिन्ह असल्याने आणि या चिन्हावरही शिंदे गटाने हक्क सांगितल्याने हे चिन्हही रद्द झाले. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह खुल्या यादीतील नसले तरी, आता ते खुले करण्यात आले आहे. हे चिन्ह २००४ मध्ये ‘समता पक्षा’ला देण्यात आले होते.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाला वापरता येईल. शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ तसेच, ‘गदा’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. मात्र, ‘गदा’ या चिन्हालाही धार्मिक संदर्भ असल्याने आयोगाने हे चिन्ह नाकारले. धार्मिक संदर्भ असलेली चिन्हे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे म्हणून न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी, दुपारी एक वाजेपर्यंत पक्ष व चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्यास सांगितले होते. मात्र, दोन्ही गटांकडून सादर झालेल्या नाव आणि चिन्हांमध्ये साधर्म्य असल्याचंही उघड झालं. त्यामुळे आयोगाकडून कोणता निर्णय घेतला जाईल, याकडे लक्ष लागले होते. अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी शिंदे गटाने केली होती. त्यावर, शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे मूळ नाव व ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हही गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला.