मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंच्या या भेटींवरुन शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. त्यांच्याकडून निष्ठेच्या चार गोष्टी शिका असा सल्लाच त्यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

“मनोहर जोशी आणि लीलाधर डाके हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक कडवट शिवसैनिक म्हणून कठीण प्रसंगात ठामपणे उभे राहिले. डाके आणि जोशी सरांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अनेक वादळात, संकटात शिवसेनाप्रमुख, शिवसेनेबरोबर ते निष्ठेने राहिले. अशा कडवट शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच यातून त्यांना प्रेरणा आणि बोध मिळेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!

“मनोहर जोशी, लीलाधर डाके पक्षाचे निष्ठावान नेते आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं फार आहे. मुख्यमंत्री अशा नेत्यांच्या भेटीसाठी जात असतील तर निष्ठेच्या गोष्टीही शिकल्या पाहिजेत,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

“महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल”, संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले “आमदार आमच्या संपर्कात असून…”

शिंदे गटाकडून होत असलेल्या नियुक्तांवर बोलताना ते म्हणाले “शिवसेना इथेच आहे. ते कोणत्या पक्षासाठी नियुक्त्या करत आहेत? त्यांना काय अधिकार आहे? हा भातुकलीचा पोरखेळ सुरु आहे. त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहत नाही”. तुम्ही तुमचा वेगळा पक्ष स्थापन करा आणि आपलं अस्तित्व दाखवा असं आव्हानही त्यांनी यावेळी दिलं.

“सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही या मताशी मी ठाम आहे. ते स्वप्न असू शकतं. काहींना कोणत्याही मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं,” असा टोला त्यांनी लगावला.

या भेटीमागे दडलंय काय? एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी; चर्चांना उधाण

“आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेत सत्ता आणायची आहे. पण ही सत्ता मिळेल त्या मार्गाने आणायची नाही. लोकशाही मार्गाने आम्ही सत्ता आणू आणि ती वेळ लवकरच येईल,” असंही ते म्हणाले.

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात दौरा करणं जनतेसाठी चांगली गोष्ट आहे. आज राज्यात ठिकठिकाणी महापूर आला आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. अजून राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या असताना त्यातून वेळ काढत राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी फिरणार असतील तर त्यात टीका करण्यासारखं काही नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“आम्ही कायद्याचं पालन करणारे आहेत. राजकीय दबावासाठी ईडी चौकशी सुरु आहे. माझा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. पण संजय राऊत काय आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे. माझ्यावर कोणत्याही माध्यमातून कितीही दबाव आला तरी हा संजय राऊत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबतच राहणार, गुडघे टेकणार नाही,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.