महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्य सरकार आणि राजभवन यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र सुपूर्द केलेहोते. विधानसभा अधिवेशनात सभापतींची निवडणूक घेण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चांगलेच संतापले असल्याचे पाहायला मिळत आहे. पत्रातील भाषा धमकी देणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“महाराष्ट्राचे राज्यपाल सद्गृहस्थ आहेत. राज्यपालांनी अनेक वर्षे संघाचे प्रचारक म्हणून सेवा केली आहे. ते उत्तराखंडचे मुख्यमंत्रीही होते. राज्यपालांवर कोणीही दबाव आणू शकत नाही हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. महाराष्ट्रा राज्यपाल आल्यापासून आम्ही त्यांचा आदर करत आहोत. राज्यपालांचा अनादर व्हावा अशा प्रकारचे कोणतेही कृत्य सरकारकडून, मुख्यमंत्र्यांकडून मला तरी झाल्याचे दिसत नाही. राजभवनावर गेल्यानंतर ते प्रेमाने आदर सत्कार करतात. पण त्यांच्यावर दबाव कोण आणत आहे हे मला माहित नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले असते तर बरे झाले असते,” असे संजय राऊत म्हणाले.

“अभ्यास करुन अजीर्ण झालं असेल तर महाराष्ट्राचे आरोग्य खातं सक्षम आहे”, संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

“१२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या संदर्भातील विषय त्यांच्याकडे प्रलंबित आहे. तिथून ही ठिणगी पडली आहे असं मला वाटतं. मंत्रीमंडळाने केलेल्या शिफारसी या राज्यपालांनी स्विकारायच्या असतात, अशी आपली घटना सांगते. महाराष्ट्राच्या राज्यपालांवर कोणी केंद्रातून दबाव आणत आहे का त्या दबावातून १२ सदस्यांची नेमणूक त्यांनी रखडवून ठेवल्याची आम्हाल भीती वाटत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांवर अशा प्रकारचा दबाव आणून काम करुन घेणे हे आमच्या सरकारला सुद्धा मान्य नाही. राज्यपाल दुःखी असतील तर आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत,” असे राऊत म्हणाले.

“विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारने राज्यपालांकडे परवानगी मागितली होती. राज्यपालांनी नाकारली आणि निवडणुक झाली नाही. हा कुठे दबाव आहे. राज्यपालांवर दबाव केंद्राचा आहे. त्यामुळेच राज्यपाल दुःखी आहेत याची मला खात्री आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

“केंद्र सरकार किती नियमाने वागते हे देशाला माहिती आहे”; विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन संजय राऊतांची टीका

राज्यपालांनी पत्रात काय म्हटले?

“तुम्ही (निवडणुकीबाबतचे) नियम बनवताना घटनेच्या कलम २०८ चा आधार दिला आहे. पण त्याच कलमात हेही म्हटलं आहे की घटनेतील तरतुदींचं पालन करूनच राज्य सरकार नियमांमध्ये बदल करू शकतं. मी राज्यघटनेचं रक्षण करण्याची शपथ कलम १५९ नुसार घेतली आहे. त्यामुळे नियमांमध्ये सुधारणा करून या निवडणुका घेण्याची ही पद्धत प्रथमदर्शनी घटनाविरोधी वाटत असताना त्याला सध्या तरी परवानगी देता येणार नाही”, असं राज्यपालांनी या पत्रात म्हटलं आहे.

अत्तर व्यावसायिकाच्या घरी करोडोंची संपत्ती सापडल्यानंतर संजय राऊतांचा मोदींवर निशाणा, म्हणाले “याच अत्तराचा वापर करुन…”

घटनाविरोधी गोष्टीला परवानगी देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकता येणार नाही, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे. “मी कधीही सभागृहांचे अधिकार किंवा त्यांची कार्यपद्धती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. पण घटनेच्या कलम २०८ नुसार जी प्रक्रिया घटनाविरोधी दिसत आहे, तिला परवानगी देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाही”, अशा शब्दांत राज्यपालांनी राज्य सरकारला सुनावलं आहे.

दरम्यान, पत्रातील भाषेमुळे आपण दु:खी झाल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. “तुम्ही पत्रात वापरलेली भाषा असह्य आणि धमकीवजा होती. यामुळे सर्वोच्च घटनात्मक कार्यालय असलेल्या राज्यपालांच्या कार्यालयाचा अपमान झाला असून त्याची प्रतिमा मलीन झाली आहे”, असं या पत्रात राज्यपालांनी नमूद केलं आहे.