राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. “४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील” असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच पंकजा मुंडेंना एकटे पाडण्याचा भाजपाचा डाव आहे. मुंडे कुटुंबाच आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचे नातं आहे. आणि आम्हाला पंकजा मुंडेंची काळजी असल्याचेही राऊत म्हणाले.
हेही वाचा – Rajya Sabha: भाजपा जिंकला, पण तो विजय खरा आहे काय?; सामना ‘रोखठोक’मधून संजय राऊतांची विचारणा
फ
उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा
राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली येथे संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी मुख्यमंत्री आणि नेत्यांना ममता यांनी पत्र लिहले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह २२ नेत्यांना पत्र लिहिले आहे. मात्र, उद्धव ठाकरे त्यावेळी अयोध्या दौऱ्यावर असल्यामुळे या बैठकीला शिवसनेचा एक प्रतिनिधी हजर राहील, असे राऊत म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचा पराभव
राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. पुरेसे संख्याबळ असूनही पवार यांचा पराभव झाल्यामुळे भाजपाला अपक्षांची मते फोडण्यात यश आले असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.