राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सभागृहातील आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात जाऊन बसलं आहे. आधीच युती तुटल्यापासून सेना आणि भाजपामध्ये विस्तवही जात नसताना आता शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार पडल्यानंतर या दोन्ही पक्षांमधलं वितुष्ट विकोपाला गेलं आहे. राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांसोबतच राजकीय टोलेबाजीवरून देखील या दोन्ही पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता महाराष्ट्रासोबत राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना संपवण्याच्या भाजपाच्या धोरणामुळे कमळ बदनाम झाल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपाच्या या धोरणाचा समाचार घेतला आहे.

“विष्णूचे आवडते फूल कमळ बदनाम”

भाजपाच्या धोरणांमुळे भगवान विष्णूचं आवडतं फूल असलेलं कमळ बदनाम झाल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. “सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे असे जे सुरू आहे त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला आहे”, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…

“दिल्लीत ऑपरेशन कमळ फेल”

“‘दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन कमळ ‘फेल’ गेले आहे. भाजप उघडा पडला आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. बिहारमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ चालले नाही व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी अमित शहा यांना खुले आव्हान दिले की, ‘‘ईडी, सीबीआय वगैरे लावून माझे सरकार पाडून दाखवा.’’ महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत”, असं अग्रलेखात नमूद करण्यता आलं आहे.

‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली’चा नेमका अर्थ काय? भरत गोगावले म्हणतात, “त्यांच्या वैयक्तिक जीवनावर…!”

“महाराष्ट्रातली मेंढरे घाबरून पळाली तशी…”

दरम्यान, महाराष्ट्र आणि दिल्लीतील परिस्थितीची तुलना शिवसेनेकडून करण्यात आली आहे. “‘आप’चे आमदार फोडण्यासाठी वीस-वीस कोटी रुपयांची ‘ऑफर’ दिल्याचा आरोप तर स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच केला आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी किती घातक आहे हे किळसवाण्या पद्धतीने समोर आले. महाराष्ट्रात याच पद्धतीने ऑपरेशन केले गेले, पण मोठे राज्य असल्याने व शिवसेना पाडणे हाच मुख्य अजेंडा असल्याने ईडीचा धाक अधिक पन्नास ‘खोके’ अशी बेगमी केली असे सर्रास बोलले जाते. महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली तसे दिल्लीचे आमदार व त्यांचे नेते पळाले नाहीत. ते भाजप व ईडीविरोधात ठामपणे उभे राहिले”, असं यात म्हटलं आहे.

“…म्हणून भाजपा गडकरी-चौहानांच्या मागे लागली!”

“केंद्र सरकार व त्यांच्या सूत्रधारांना २०२४ चे भय वाटते आहे. हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे आहे. या सूत्रधारांना आपल्या सावलीचेही भय वाटते. म्हणून ते नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान यांच्याही मागे लागले, असे दिसते. इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच. त्यांचे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे”, अशा शब्दांत अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

Story img Loader