देशाच्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या मोखाडा आणि वाडा या दोन तालुक्यांमध्ये घडलेल्या घटनांमुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मोखाड्यातल्या आदिवासी पाड्यातून रुग्णालयात पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे झालेल्या दिरंगाईत एका बाळंत झालेल्या महिलेला तिची जुळी मुलं गमवावी लागली, तर वाडामध्ये एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी जीप उपलब्ध होऊनही कच्च्या रस्त्यावर चिखल झाल्यामुळे ती जीप दोन तास धक्का मारत मुख्य रस्त्यापर्यंत आणावी लागली. या प्रकारांमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात असताना आता शिवसेनेने या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून या मुद्द्यावर शिवसेनेने सरकारला परखड सवाल केले आहेत.

“ही तर शिंदे सरकारची सुलतानी”

“सध्या मुसळधार पाऊस, महाप्रलय वगैर चिंतेचे वातावरण म्हणजे अस्मानी संकट आहे, पण लकवा मारलेली आरोग्य व्यवस्था म्हणजे फडणवीस-शिंदे गट सरकारची सुलतानी आहे. ठाण्याजवळच्या ‘मोखाडा’, ‘वाडा’ अशा आदिवासी भागांतील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे महाराष्ट्राला लाज आणणारे आहेत. दोन घटनांनी तर व्यवस्थेची पोलखोलच केली. ठाण्याजवळील मोखाडा तालुक्यात बोटोशी हे अतिदुर्गम गाव आहे. एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होता आणि महाराष्ट्रातील आदिवासी पाडे अशा पारतंत्र्याच्या अंधारात आपल्याच आप्तांचे मृत्यू उघड्या डोळय़ाने पाहत होते”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

“समृद्धी महामार्ग तर निर्माण केला, पण…”

मेळघाट, धुळे, नंदुरबार हे दुर्गम भाग आहेतच, पण मोखाडा, पालघर, वाडा हे भाग तर ठाण्यातले, मुंबईजवळचे आहेत व गेली अनेक वर्षे विद्यमान मुख्यमंत्री या भागांत नेतृत्व करीत आहेत. ते कधी या रस्त्यांवरून गेल्याचे दिसत नाही. फडणवीस-शिंदे महाशयांनी समृद्धी महामार्ग निर्माण केला. पण आपल्याच ठाणे जिल्हय़ातील आदिवासी पाडय़ांना ते रस्ता देऊ शकले नाहीत. रस्त्यांशिवाय आदिवासी महिला, वृद्ध, अर्भके तडफडून मरत आहेत”, अशा शब्दांत राज्य सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

“…तर वंदना बुधरची मुले वाचली असती!”

गेली अनेक वर्षे विद्यमान मुख्यमंत्री व त्यांचे हस्तकच या जिल्ह्यांचे पालकमंत्री व सर्वकाही होते. मग आदिवासी महिलांवर पोटचे गोळे गमावण्याची वेळ का यावी? सुरत-गुवाहाटीचे एखाद-दुसरे खोके रस्त्यांच्या कामी आले असते तर वंदना बुधर हिची जुळी मुले वाचली असती. पण दुर्दैव तिचे”, अशा शब्दांत मोखाड्यातील घटनेवरून शिवसेनेनं राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

सीबीआयला चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक नाही?; महाविकास आघाडीचा निर्णय शिंदे सरकार बदलण्याची शक्यता

“पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 25 हजार 826 कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या गेल्या. शिवाय रस्त्यांसाठी शेकडो कोटींचे वेगळे आकडे असतानाही वंदना बुधरने आपली जुळी मुले गमावली आहेत. कारण या पैशांचा विनियोग जनतेसाठी नाही तर आमदार-खासदारांना खोकी देण्यासाठी सुरू आहे. खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार?” असा सवाल देखील अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

“भाजपावाल्यांना वंदना बुधर आणि तिची मुलं हिंदू वाटत नाहीत?”

“पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड जमावाने केले तेव्हा हिंदुत्व खतऱ्यात आले म्हणून सरकारवर हल्ले करणाऱ्या भाजपवाल्यांना वंदना बुधर व तिची जुळी मुले हिंदू वाटू नयेत व या हत्याकांडावर त्यांनी तोंड उघडू नये, या ढोंगास काय म्हणावे? पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच वंदना बुधर हिच्या जुळय़ा मुलांचा मृत्यू गंभीर आहे”, असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.