हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. नागपुरातलं राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राज्यात देखील या वातावरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे सरकारवर आगपाखड करत असताना आता त्यांच्याच उपस्थितीत ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने विरोधी गटाच्या लोकांचे हातपाय तोडण्याची भाषा केली आहे. त्यांचं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं घडलं काय?

सोलापुरातल्या हुतात्मा स्मृती मंदिरात मंगळवारी संध्याकाळी सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेची जाहीर सभा सुरू होती. यावेळी सोलापूर शहराचे संपर्क प्रमुख अनिल कोळीक यांनी सुषमा अंधारेंच्या आधी भाषण केलं. या भाषणात कोळीक यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. मात्र, बोलताना त्यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले ठाकरे गटाचे पदाधिकारी?

कोळीक यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांचा उल्लेख केला. हे कार्यकर्ते आपल्या सभेत येऊन माहिती पोहोचवत असल्याचाही दावा त्यांनी केला. त्यावर बोलताना अशा कार्यकर्त्यांना त्यांनी व्यासपीठावरूनच इशारा दिला. यावेळी सुषमा अंधारेही तिथे उपस्थित होत्या. “येताना अर्ध्या तासापूर्वी आम्हाला समजलं की ते उद्योग करायला त्यांचे भाडोत्री गुंड आलेच नाहीत. आहेत तेही निघून गेले. तरीही कुणी चुकून माकून या सभागृहात बसलेला असेल तर त्याला मला सांगायचंय. हे बघ बाबा, तू बसला आहेस. काय खबर द्यायची आहे, काय रेकॉर्डिंग करायचं असेल ते कर. पण तुला हातपाय जागेवर हवे असतील, तर शांततेत बस आणि शांततेत निघून जा. पण जर त्यानं काही उद्योग केलाच.तर मात्र शिवसैनिकांना आपला थेट आदेश आहे की त्याचे हातपाय तोडल्याशिवाय त्याला बाहेर सोडायचं नाही अजिबात. भरपूर दिवस असं काही केलेलं नाही ना? त्यामुळे आपल्या हाताला जरा जास्त रग आहे”, असं कोळीक म्हणाले.

“महाराष्ट्र झोपलेला असताना ते हळूच…”

“चांगलं काम केल्यानंतर त्याचं कौतुक करण्याऐवजी हे ४० मिंधे गद्दार रात्रीच्या वेळी काळोखात डाव साधला. महाराष्ट्र झोपलेला असताना ते हळूच त्या रस्त्यानं पळून गेले. तुम्ही कितीही सत्तेचा गैरवापर करा. पण शिवसैनिक तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही”, असंही कोळीक यावेळी म्हणाले.

दरम्यान, कोळीक यांच्या या विधानावर अद्याप शिंदे गटाकडून कोणती प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.