लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यातही सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरून एकमेकांना लक्ष्य केलं जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर (ट्विटर) केलेल्या एका पोस्टचीही अशीच चर्चा चालू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हटलंय सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये?

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांची नावं घेऊन खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला असून त्यासाठी काही घडामोडींचा दाखला त्यांनी या पोस्टमध्ये दिला आहे.

“पंकजा मुंडे-महादेव जानकर यांना उमेदवारी, जळगावचा जाहीर उमेदवार बदलण्याची तयारी, एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शाह यांच्याशी भेट, देवेंद्र फडणवीसांना भेटीसाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागणं, पण त्याचवेळी नवनीत राणा यांना मात्र तासाभरात भेट… या सगळ्याचा अर्थ फडणवीसांना विनोत तावडेंनी चितपट केलं आहे”, अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. या पोस्टसोबत ‘आताकधीचयेणारनाही’ असा हॅशटॅगही त्यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या व्हायरल घोषणेवरून हा खोचक टोला लगावल्याचं बोललं जात आहे.

२०१९चं नाराजीनाट्य!

२०१९च्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांवेळी विनोद तावडे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विनोद तावडेंबरोबरच तेव्हा नाराजांमध्ये आत्ता बीडमधून उमेदवारी मिळालेल्या पंकजा मुंडे, पुढच्याच वर्षी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला होता. त्यावेळी एकनाथ खडसेंनी त्यांची नाराजी उघडपणे फडणवीसांविरोधात बोलूनही दाखवली होती. तेव्हापासून विनोद तावडेंना राष्ट्रीय राजकारणात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. सध्या भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी विनोद तावडेंवर आहे.

एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांदरम्यान रोहिणी खडसेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल; शरद पवारांचं नाव घेत म्हणाल्या…

एकनाथ खडसे पुन्हा भाजपाच्या वाटेवर?

दरम्यान, २०२० साली भाजपावर आणि देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम ठोकणारे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा स्वगृही परतणार असल्याची जोरजार चर्चा सध्या चालू आहे. एकनाथ खडसेंनी दिल्लीत घेतलेल्या भेटीगाठींचे दाखले यासाठी दिले जात आहेत. खडसेंना भाजपामध्ये आल्यावर कोणती जबाबदारी देऊन पुनर्वसन केलं जाईल आणि त्यामुळे कुणाला धास्ती वाटू लागली आहे अशा गोष्टींबाबतही निरनिराळे दाले केले जात आहेत. एकीकडे कन्या रोहिणी खडसेंनी आपण शरद पवारांबरोबरच राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं असताना खुद्द एकनाथ खडसेंकडून मात्र कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.