अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची जीभ घसरली. “मी बायकोच्या भरवशावर राजकारण करत नाही”, असं म्हणत नितीन देशमुखांनी रवी राणांना शिवी दिली. तसेच पुढील निवडणुकीत जनता राणांना त्यांची जागा दाखवेल, असंही म्हटलं.
नितीन देशमुख म्हणाले, “मी बायकोच्या भरवशावर राजकारण करत नाही. नितीन देशमुख जनतेच्या भरवशावर आणि कामाच्या जोरावर राजकारण करतो. हा ह#### काय सांगतो की, नितीन देशमुखचा पापाचा घडा भरला. हा ह#### मराठी माणसाच्या भरवशावर उभा राहिला.”
हेही वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर एक महिन्याने सुनावणी का? प्रत्यक्ष हजर असणारे वकील म्हणाले, “कारण…”
“आगामी निवडणुकीत जनता जागा दाखवेल”
“रवी राणांचा जन्म कुठला आहे, महाराष्ट्रातील की अमरावतीतील हेही लोकांना माहिती नाही. असं असूनही मराठी माणसाने त्यांना मोठं केलं. आगामी निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल,” असं म्हणत नितीन देशमुख यांनी टीका केली. ही टीका करताना देशमुखांनी एकेरी भाषेचा वापर केला.