पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘वॅग्नर ग्रुप’ एकत्र आला. हा ग्रुप भाडोत्री नाही हे महत्त्वाचे. पुतिन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल, पण लोकशाही मार्गाने. पाटण्यातील ‘वॅग्नर ग्रुप’ने तोच इशारा दिला, असं मत शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’तून व्यक्त केलं आहे.

“पुतिन यांनाही धक्का दिला जाऊ शकतो व हुकूमशहाची घाबरगुंडी उडते हे वॅग्नर बंडाच्या रूपाने जगाने पाहिले. अर्थात कोणत्याही हुकूमशाहीला असा हादरा कधी ना कधी बसत असतो. पुतिन असो की मोदी, त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो. हिंदुस्थानातील सत्ता ही अहिंसक ‘वॅग्नर’ मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे,” असे ठाकरे गटाने म्हटलं.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”
Sanjay Raut On MNS chief Raj Thackeray Uddhav Thackeray meet
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…”
Uddhav Thackeray Criticized Amit Shah and Modi
Uddhav Thackeray : “हिटलर आणि मुसोलिनीही भरघोस मतांनी…”; उद्धव ठाकरेंची मोदी-शाह यांच्यावर बोचरी टीका
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

हेही वाचा : “पवारसाहेब तुम्ही केली तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केली तर…”, फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल!

“भारतीय जनता पक्ष हा हवेने भरलेला फुगा आहे. तो जरा जास्तच फुगवला आहे. सत्ता, मत्ता आणि प्रसिद्धी यामुळे लोकांत भ्रम निर्माण करता येतो, पण लोकांच्या मनावर प्रदीर्घ काळ सत्ता गाजवता येत नाही. मोदी, शहा यांनी विजयाचे ढोल वाजविण्यासाठी, मतदारांवर दबाव आणण्यासाठी भाडोत्री लोक मोठ्या प्रमाणात निर्माण केले. हे भाडोत्रीच त्यांच्यावर पहिला वार करतील,” असे ठाकरे गटाने सांगितलं.

हेही वाचा : “…त्यात बावनकुळेंना वाईट वाटायचं कारण काय?” ‘त्या’ विधानावरून अजित पवारांची टोलेबाजी!

“पुतिन यांचे म्हणणे असे की, ‘वॅग्नर संघटनेने पाठीत खंजीर खुपसला, देशद्रोह केला.’ पुतिन यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. हुकूमशहा आपल्या सोयीप्रमाणे देशद्रोहाची व्याख्या करत असतो. हिंदुस्थानातही तेच सुरू आहे व लोकांच्या मनात क्रांतीची भावना रुजत आहे. भाजपाने सत्ता टिकविण्यासाठी अनेक बाजारबुणगे म्हणजे मिंधे आपल्याभोवती रक्षक म्हणून उभे केले. उद्या हेच लोक सगळ्यात आधी मोदी-शहांच्या पाठीत वार करून रस्त्यावर उतरतील,” असेही ठाकरे गटाने सांगितलं.

Story img Loader