महाराष्ट्राचा विचार व संस्कृतीचा वारसा महान आहे. त्या विचारांशीही संबंध नसलेले लोक महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री व त्यांचा मिंधे गट आज उन्मादाच्या नशेत आहे. ते घराणेशाहीवर बोलतात, पण गुलामगिरीचे पट्टे गळय़ात बांधून बेताल बडबडतात. त्यांचा उन्माद फार टिकणार नाही. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणजे ‘ट्रायब्युनल’ने दिलेला निर्णय अंतिम नाही. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय व जनतेचे न्यायालय आहे. निकाल तेथेच लागेल व खोकेबाजांची घराणी कायमची नष्ट होतील! ती वेळ दूर नाही. महाराष्ट्र रामशास्त्र्यांचा आहे. छ’दाम’शास्त्र्यांचा नाही, अशी टीका ठाकरे गटानं ‘सामना’ अग्रलेखातून राहुल नार्वेकरांवर केली आहे.

“विधानसभा अध्यक्षांनी कसे वागू नये हे महाराष्ट्रात काल दिसून आले. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ‘ट्रायब्युनल’ म्हणजे न्यायदान करणाऱ्या लवादाची भूमिका बजावायला सांगितले. मात्र मि. ट्रायब्युनल राहुल नार्वेकर हे सरळ शिंदे गटाच्या वकिलाच्या भूमिकेत गेले. नार्वेकरांच्या तथाकथित निकालपत्राची देशभरात चेष्टा सुरू आहे. जो महाराष्ट्र न्या. रामशास्त्री प्रभुणे यांची परंपरा सांगतो त्या महाराष्ट्रात असे छ’दाम’ शास्त्री निपजावेत व त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचाच मुडदा पाडावा यासारखे दुर्दैव नाही. पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधिमंडळातील बहुमत याचा अभ्यास करून एकनाथ शिंदे यांच्या गटा ला मी खरी शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा फूत्कार छ’दाम’शास्त्र्यांनी सोडला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारलेला हा डंख आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटास खरी शिवसेना म्हणून मान्यता देणे म्हणजे विधान भवनाच्या दारातील पट्टेवाल्याने विधानसभा अध्यक्षांनाच त्यांच्या दालनाबाहेर काढण्यासारखे आहे,” असं खोचक टीप्पणी ठाकरे गटानं केली आहे.

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Priya Sarvankar on Amit Thackeray
‘त्या’ युवराजाला जनता कंटाळली, आता हा ‘राज’पुत्र काय करणार?, सदा सरवणकरांच्या मुलीची दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…

“विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय जनता मान्य करणार नाही”

“मुळात ‘ट्रायब्युनल’ने वाचून दाखवलेले निकालपत्र म्हणजे कोलांटउड्या आहेत. या कोलांटउड्यांमुळे महाराष्ट्राच्या जनतेत प्रचंड संतापाचा लाव्हा उसळून बाहेर पडत आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयास न जुमानता अशा माकडउड्या मारणे हीच हुकूमशाही आहे. त्याच हुकूमशाहीविरोधात देशात वातावरण तयार होत आहे. सरन्यायाधीशांनी दिलेल्या निर्देशांना हरताळ फासून महाराष्ट्रातील फुटीर आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय जनता मान्य करणार नाही. चार पक्ष बदलून पीठासीन अधिकारी म्हणून बसलेली व्यक्ती सरन्यायाधीशांचा निर्देश डावलू शकत नाही, पण मोदी युगात नीतिमत्तेची चाड ठेवायला घटनात्मक पदावर बसलेली एकही व्यक्ती तयार नाही,” असंही ठाकरे गटानं म्हटलं आहे.

“महाराष्ट्राच्या मातीचे पावित्र्य नष्ट करण्याचा हा प्रकार”

“शिंदे गटाच्या गोगावले यांना विधानसभा अध्यक्षांनी ‘व्हिप’ म्हणून मान्यता देणे बेकायदा होते. कुणाची बाजू योग्य याची पडताळणी न करता विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला हे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले, पण पक्षांतरे करून ‘पीठासीन’ झालेल्यांनी ते मान्य केले नाही. महाराष्ट्राच्या भूमीवर एक अनधिकृत सरकार उभे आहे, ते अधिकृत करण्याचे काम अखेर विधानसभा अध्यक्षांनी केले. फुटीर शिंदे यांची नेमणूक त्यांनी जवळजवळ शिवसेनाप्रमुखपदी केल्याची निर्लज्ज घोषणाच निकालपत्रात केली. महाराष्ट्राच्या मातीचे पावित्र्य नष्ट करण्याचा हा प्रकार आहे. निवडणूक आयोग व निकाल देणाऱ्यांच्या बापजाद्यांना विचारून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती. प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून विचारांचा, लढ्याचा, स्वाभिमानाचा वारसा घेऊन त्यांनी शिवसेना निर्माण केली. शिवसेना म्हणजे एका आंदोलनाची ठिणगी होती. त्याच ठिणगीने पुढे विचारांचा वणवा पेटवला. ही ठिणगी मिंधे गटातील पाद्रया पावट्यांच्या खोक्यांतून निर्माण झाली नाही,” असं ठाकरे गटानं शिंदे गटाला ठणकावून सांगितलं आहे.

“श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारीवर दोन वेळा खासदार झाले”

“राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “हा घराणेशाहीचा पराभव आहे.” हे सांगताना त्यांनी स्वत:च्या घराणेशाहीकडे बोट दाखवायला हवे. अचानक खासदार झालेला श्रीकांत शिंदे हा आपला मुलगा नाही हे त्यांनी जाहीर करावे व मगच घराणेशाहीवर टिचक्या माराव्यात. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारीवर दोन वेळा खासदार झाले. गंगाधर फडणवीस यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही तरी खास नाते असावे असे सांगतात. जय शाहा हे महान क्रिकेटपटू अमित शाहांचे कोणी तरी लागतात. कोणी म्हणतात रमाकांत आचरेकर, डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स वगैरेंनी क्रिकेटचे धडे चि. जय शाहांकडूनच घेतले आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या उद्धाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. पीयूष गोयल व वेदप्रकाश गोयल यांचेही काही तरी संबंध असल्याचा संशय आहे. नारोबा तातू राणे व नित्या नारू राणेही एकाच घरात राहतात. महाराष्ट्रात विखेपाटील, मुंडे परिवार, लातुरात निलंगेकर अशा अनेक घराण्यांची भाजपातील नाती- गोती तपासावी लागतील,” असं म्हणत भाजपातील घराणेशाहीवर ठाकरे गटानं हल्लाबोल केला आहे.