विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगलाच वादळी ठरला. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपल्या भाषाणामध्ये राज्यात घडलेल्या सत्तानाट्यावर भाष्य केले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
हेही वाचा >>> अधिवेशनात गुलाबराव पाटलांचे आक्रमक भाषण, म्हणाले ‘आम्ही बंड नाही तर…’
“गुजरातला जाताना एकही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊया असं मला म्हणाला नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. हा त्यांचा विश्वास आहे. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाहीये. सुनिल प्रभू यांना माहिती आहे की, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु होता. तुम्ही साक्षीदार आहात. शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं की जे होईल ते होऊदे लढून शहीद होऊदे तरी चालेल. पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल. बाकीचे वाचतील,” असे एकनाथ शिंदे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.
हेही वाचा >>> महाभारत, रामायण ते पानिपतचं युद्ध, अधिवेशनात भास्कर जाधवांचं खणखणीत भाषण, भाजपावर टीकेचे आसूड
तसेच, “मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं की, चिंता करु नका. ज्या दिवशी मला वाटेल, की तुमचं नुकसान होतंय, त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. तुमचं भवितव्य सुरक्षित करुन मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईन. ही छोटी घटना नाही. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही ईकडून तिकडे जाण्याची हिंमत करत नाही. हे का झालं? कशासाठी झाल? का केलं? या सर्वांच्या मुळाशी जायला हवं होतं. याचं कारण शोधायला हवं होतं,” असेदेखील एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा >>> Video: विधानसभेच्या दारात शिवसेनेच्या बंडखोर आमदाराला पाहताच आदित्य ठाकरे त्याला म्हणाले, “एवढे जवळचे असून…”
“एवढी बदनामी करण्यात आली. माझ्याकडे चर्चेसाठी माणसे पाठवण्यात आली. तिकडे मला गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आलं. हे सर्व बेकायदेशीरपणे करण्यात आलं. एकीकडे चर्चा करायची आणि दुसरीकडे गटनेतेपदावरुन काढून टाकायचे, पुतळे जाळायचे, घरावर दगडफेक करण्याचे आदेश द्यायचे. एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगड मारण्याची हिम्मत करणार अजून पैदा झालेला नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना घेरलं.