शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रात भारताच्या लोकशाही मूल्यांचं खच्चीकरण केलं जात असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. लोकशाही संपवून हुकूमशाही जिथे निर्माण झाली तिथे लोकांचं काहीही भलं झालेलं नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

माझ्या प्रिय महाराष्ट्रवासीयांनो,

हे आपलं वर्ष आहे! आपण हे वर्ष फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी समर्पित करायला हवं. भारताच्या लोकशाही मूल्यांचं आणि संविधानाचं कायेदशीर बाबींचाच वापर करुन खच्चीकरण केलं जाताना दिसत आहे. जगभरात जिथे लोकशाही संपवण्यात आली, तिथे ती संपवण्यासाठी अशाच संस्थांचा वापर केला गेला होता. ज्या खरंतर लोकशाहीच्या रक्षणासाठी अस्तित्त्वात आल्या होत्या. लोकशाही संपवून हुकूमशाही निर्माण झालेल्या ठिकाणी आजपर्यंत सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही झालेले नाही. जे काही केले गेले ते केवळ मोजक्या लोकांसाठी, तुमच्या-माझ्यासारख्या १.३ अब्ज लोकांसाठी तर नक्कीच नाही.

Rahul Gandhi Post For Balasaheb Thackeray
Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि आदित्य..”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mitali Thackeray on womens public toilets
Mitali Thackeray : प्रचारादरम्यान मिताली ठाकरेंना काय जाणवलं? म्हणाल्या, “महिलांशी कनेक्ट झाल्यावर…”
Amit Thackeray and Mitali Thackeray
Amit Thackeray : “मला वाटलेलं मिताली…”, निवडणुकीच्या प्रचाराबाबत अमित ठाकरे पत्नीच्या पाठिंब्याविषयी काय म्हणाले?
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
Bala Nandgaonkar Statement on Uddhav and Raj Thackeray
Bala Nandgaonkar : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी असलेलं रक्ताचं नातं जपावं, अजूनही..”, कुठल्या नेत्याने केली विनंती?
Raj Thackeray Election
Raj Thackeray : राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत? बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाले…
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण

पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणायची आहे

आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर, पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणणं हेच आपलं ध्येय आहे. २०२२ च्या मध्यात गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय आणि प्रगतीशील महाराष्ट्राचं रुपांतर बिल्डर्स आणि कंत्राटदार मिळून चालवत असलेल्या एका बेकायदेशीर राजवटीत केलं. आता खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आपली शहरं उद्ध्वस्त होत आहेत. रस्ते, विकास योजनांमध्ये घोटाळे होते आहेत. उद्यानं गिळंकृत केली जात आहेत. इतकंच नाही तर रस्त्यावरील फर्निचर, सॅनिटरी पॅड्स यांच्याबाबतीतही घोटाळे होत आहेत. हे फक्त भ्रष्ट कारभाराचं वरवरचं टोक आहे.

ग्रामीण भागातल्या अडचणी तर टोकाच्या भीषण होत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढतच चालल्या आहेत. सततच्या हवामान बदलाला आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना मुलभूत नुकसान भरपाईची मदत केली जात नाही. त्यांनी धीर द्यायला सरकारकडून कुणीही जात नाही. खोके सरकार फक्त बॅनरवर दिसतं. हे खरोखरच भयावह आहे.

शहरं लुटली जात आहेत, ग्रामीण भागात मदत मिळत नाही

एकीकडे शहरं लुटली जात आहेत, दुसरीकडे ग्रामीण भागाला कुठलीच मदत मिळत नाही आणि गुन्हेगार मात्र मोकाट सुटले आहेत. एका आमदाराचा मुलगा एका व्यावसायिकाचं अपहरण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला, परंतु आजवर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. आणखी एक आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखताना कॅमेरात पकडला आणि त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची बातमीही आपण ऐकली. त्याच आमदाराला उद्दामपणाचं कौतुक म्हणून, आता सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. एका हिंदू सणात, बंदुकीचा धाक दाखवून घाबरवणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं जातं. हे हिंदुत्व तुम्ही-आम्ही, आपण स्वीकारणार आहोत का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

दहशत माजवणाऱ्यांना बक्षीस

काही कॅबिनेट मंत्र्यांनी महिला खासदारांना शिवीगाळ केली. काही आमदार फोनवर अधिकाऱ्याला धमकावत असल्याचे कॉलही रेकॉर्ड झाले आहेत. परंतु या सर्व कृत्यांसाठी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली. मागच्या दोन वर्षात आपल्या राज्यात २ लाखांनाहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करु शकणारे उद्योग, राजवटीच्या लाडक्या राज्यात पळवले गेले. नैसर्गिकरित्या त्यांनी नक्कीच महाराष्ट्राची निवड केली असती, पण त्यांना जबरदस्तीने दूर नेले गेले. देशभरातून अनेक लोक उदरनिर्वाचाी स्वप्नं घेऊन राज्यात येतात. पण आपल्या राज्याला आणि या लोकांना मात्र या स्वप्नांपासून दूर नेलं जातं आहे.

प्रदूषण, भ्रष्टाचार, गलथान कारभार, ढासळत चाललेल्या पायाभूत सुविधा, सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा अभाव, महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची भीषण अवस्था यांसारख्या अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत. एम.टी. एच. एल आणि दिघा रेल्वे स्थानकासारख्या पायाभूत सुविधा अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

या सर्व मूळ समस्या लपवण्यासाठी, आत्ताच्या राजवटीने आपल्याला सततच्या धार्मिक, जातीय दंगली, नागरी अशांतता आणि टीव्ही वादविवादांमध्ये व्यस्त ठेवलं आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि इतर समस्यांकडून लक्ष वळावं म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक या कार्यक्रमांमध्ये गुंतवून ठेवलं जातं आणि मूळ मुद्द्यांपासून भरकटवलं जातं आहे.

आता आपण ठरवायला हवं की आपल्याला, आपल्या राज्यासाठी, शहरासाठी आपल्या शेतीसाठी, परिसरासाठी आणि आपल्या स्वतःसाठी काय हवंय? मी नेहमीच हे सांगत आलोय, जी माणसं वर्तमान आणि भविष्याचा विकास करण्यासाठी काहीच करु शकत नाहीत, भूतकाळातल्या वादात आपल्याला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. सत्य हे आहे की आपल्याला भूतकाळाबद्दलच्या भांडणावर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. पण आपलं भविष्य, आपण आपल्या उद्यासाठी काय करणार आहोत यावर अवलंबून आहे.

ज्यांनी लोभापायी स्वतःला विकलं, जे उद्या आपलं भविष्यही विकायला मागेपुढे बघणार नाहीत. अशा गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची, तुमची प्रगती होईल असं खरंच तुम्हाला वाटतं का?

महाराष्ट्राचा अभिमान लुटण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राचा अभिमान, वैभव लुटण्याचा प्रयत्न ही महाराष्ट्रविरोधी राजवट करत आहे. अशा राजवटीत तुमचं उज्वल भविष्य घडेल असं तुम्हाला वाटतं का? त्याहून महत्वाचं म्हणजे, लोकशाही व्यवस्थेवर चालणारं राज्य म्हणून नावाजलेल्या आपल्या राज्यात हे आता लोकशाही असल्याचं ढोंगही करत नाहीत. अशा राजवटीत तुम्ही राहायला तयार आहात का? हे वर्ष केवळ विचार करायचं नाही, तर कृती करण्याचं वर्ष आहे. ही कृती म्हणजे तुमचं ‘मत’. तुमचं मत हे तुमचं भविष्य आहे, आपलं भविष्य आहे. हे भारताबद्दल आहे, हे महाराष्ट्राबद्दल आहे आणि हे या महान राष्ट्राच्या नागरिकांबद्दल आहे. तुमचं आजचं मत तुमच्या भविष्यासाठी मौल्यवान आहे. सत्याच्या आणि न्यायाच्या बाजून लढणाऱ्यांना या हुकूमशाहीत त्रास दिला जाईल, अडचणीत आणलं जाईल, पण हा लढा जर आपण मिळून लढलो तर अंतिम विजय सत्याचाच आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र

आपला
आदित्य रश्मी उद्धव ठाकरे</strong>

असं पत्र शिवसेना उबाठाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी लिहिलं आहे. आता या पत्रावर काही उत्तर शिंदे गटाकडून किंवा भाजपाकडून दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.