शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा पार पडली. या सभेला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केली आहे. गद्दाराला नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “काहीजणांना अपेक्षा असेल, की मी गद्दारांवर बोलेल. पण, गद्दारांवर माझा वेळ घालवणार नाही. गद्दारांचा समाचार घेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. मी हिंगोलीत तुमच्यासाठी आलोय, गद्दांरासाठी नाही. गद्दार अनेक झालेत, मात्र हिंगोली कायम शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचार आणि भगव्याच्या मागे उभी राहिली आहे.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“हा नाग उलटा फिरून डसायला लागला”

“आताही काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण, त्या बेंडकुळ्यांमध्ये हवा आहे. जनतेची ताकद माझ्याकडे आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे. मध्ये नागपंचमी झाली. या गद्दाराला नाग समजून पूजा केली. मात्र, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं,” असं टीकास्र उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर सोडलं.

“कोणाची दादागिरी सहन करणार नाही”

“नाव हिंदुत्वाचं आणि सगळे धंदे अंबादास दानवे यांनी समोर ठेवले आहेत. हे असे धंदे करणारा हिंदू म्हणून घेऊ शकतो का? मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचं का? कोणाची दादागिरी सहन करणार नाही. पण, आपल्याच लोकांवरती उद्धटपणा करणार असेल, तर उद्धटपणा गाडून टाकावा लागेल,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांना दिला आहे.

Story img Loader