ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमकपणे टीका केली जात असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. आज सुषमा अंधारेंनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंनी शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केलं. तसेच, संजय राऊतांच्या येण्यामुळे ठाकरे गटाची ताकद वाढल्याचंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शिवसेनेची ऊर्जा वाढली आहे. ताकद वाढली आहे. न्यायालयाने निरीक्षण नोंदवलंय की ही अटक बेकायदेशीर होती. अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे कारवाया करण्याची ईडीची पद्धत आहे. ईडीचा रेट ऑफ कन्व्हिक्शन अर्ध्या टक्क्यानेही कमी आहे. त्यामुळे ईडीची खरंच गरज आहे का? यावर सभागृहांमधून प्रश्न विचारण्याची गरज आहे”, असं त्या म्हणाल्या.

“मी किरीट सोमय्यांचा गंडा बांधायला तयार!”

यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करणाऱ्या किरीट सोमय्यांवर सुषमा अंधारेंनी हल्लाबोल केला. “मला एक कळत नाही की जे लोक संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नातला मेहंदीवाल्याचा, गजरेवाल्याचा हिशोब मागतात, ते लोक बीकेसी मेळाव्यात करोडो रुपयांचा चुराडा केला त्याचा हिशोर कधी देणार? मी किरीट सोमय्यांना वारंवार सांगते की मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे. मी तुमच्यावर आरोप करत नाही, टीका करत नाही, काहीच वाईट बोलत नाही. उलट मी त्यांचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे. पण किरीटभाऊ, अनिल परबांचं रिसॉर्ट फार लांबचा पल्ला आहे. त्याआधी मुंबईत नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात? तुम्ही इतरांना जेव्हा हिशोब विचारता, तेव्हा भाजपातल्या आणि मित्र पक्षांतल्या लोकांना हिशोब कधी विचारणार?” असा सवाल त्यांनी किरीट सोमय्यांना केला.

पाहा व्हिडीओ –

शिर्डी अधिवेशन अर्ध्यात सोडून अजित पवार नेमकं कुठे गेले होते? त्यांनीच स्वत: केला खुलासा, म्हणाले “माझ्याशिवाय यांचं…”

“मला एक कळत नाहीये की नोंदणीच न झालेल्या पक्षाच्या बीकेसीतल्या मेळाव्यावर खर्च कुणाच्या खात्यातून झाला? यावर किरीट सोमय्या का बोलत नाहीयेत?” असाही सवाल सुषमा अंधारेंनी विचारला.

“आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा…”

दरम्यान, शिंदे गटात गेलेल्या काही नेत्यांचाही यावेळी अंधारेंनी उल्लेख केला. “भावना गवळी, प्रताप सरनाईक किंवा यशवंत जाधव या लोकांना सरकार स्थापन करण्याआधी माफिया म्हणून म्हणून किरीट सोमय्यांचा गळा सुकला होता. त्यांना क्लीनचिट तर मिळालेली नाही. त्यांच्यावर चार्जशीट कधी दाखल होणार आहे? त्यावर किरीटभाऊंनी उत्तरं द्यायला पाहिजेत. आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू हे करणं त्यांनी बंद केलं पाहिजे”, असा खोचक टोला सुषमा अंधारेंनी लगावला.