Uddhav Thackeray Interview Today: शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. बंडखोरीदरम्यान ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे शहाजीबापू पाटील प्रसिद्ध झाले होते. याचाच संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? अशी विचारणा केली आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Uddhav Thackeray Interview: पाहा उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत

“…आईला गिळायला निघालेली औलाद,” उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांवर संतापले; म्हणाले “माझंच चुकलं”

“महाराष्ट्र फार सुंदर आहे. ग्रामीण भागातील आमदारांना या निसर्गाची भुरळ पडत नाही, पण गुवाहाटीमधील निसर्गाची भुरळ पडते. महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्याची तुम्हाला ओढ, प्रेम नाही. त्याचं वैभव कधी दिसलं नाही,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

“ग्रामीण भागात राहूनही तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य कधी दिसलं नाही”

“मी स्वत: कलाकार आहे. त्यावरुन सुद्धा चेष्टा झाली होती. मी पंढपुरच्या वारी, गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. त्यावेळी महाराष्ट्र पाहिला तर इतका नटलेला, थटलेला दिसतो. आम्ही तर शहरीबाबू आहोत, तुम्ही ग्रामीण भागातील आहात. पण ग्रामीण भागात राहूनही तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य कधी दिसलं नाही, त्याचं वर्णन करावंसं वाटलं नाही आणि थेट गुवाहाटी दिसलं. मी गुवाहाटी वाईट म्हणत नाही, प्रत्येक प्रदेश चांगला आहे. पण हे मातीसाठी काय करणार?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Story img Loader