शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर शिंदे गटावर टीका केली आहे. हे शिवसैनिक नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. उद्धव ठाकरेंनी आज शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यांना बाळासाहेबांचा फोटो हवा, पण त्यांचा मुलगा नको अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे यांची आज शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. हिंमत असेल तर नवा पक्ष काढा असं आव्हान यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना दिला. एकनाथ शिंदेवर टीका करताना ते शिवसैनिक नव्हे, तर दगाबाज मुख्यमंत्री असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाला शिवसेना संपवायची होती या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…

“बाळासाहेबांचा फोटो हवा, मात्र त्यांचा मुलगा नको,” अशी खंत व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी आपलं नेतृत्व नाकारणाऱ्यांना सुनावलं. आमच्या खांद्यावर पाय ठेवून यांनी दिल्ली गाठली असल्याची आठवणही त्यांनी करुन दिली.

“पक्षप्रमुख असा उल्लेख न करणे हा कद्रुपणा”; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत आगामी काळात काही मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. आपण शिवसेनेची पुनर्बांधणी करत आहोत. अनेक महिला तसंच पुरुषांना वेगवेगळी जबाबदारी द्यायची आहे, असं उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणाले. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या तसंच प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी ते बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray on maharashtra chief minister eknath shinde sgy
Show comments