राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असताना त्यावरून महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर झाल्याचा देखील अंदाज बांधण्यात आला. भाजपाकडून तर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात सत्तापालट होण्याचे देखील संकेत दिले जात आहेत. ईडीनं राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर सुरू केलेल्या कारवाईबाबत आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘लोकसत्ता’च्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांची छोटेखानी मुलाखत घेतली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरं दिली.

शिवसेनेचा स्वभाव खरंच बदललाय का? उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “बाळासाहेबांचा काळ हा…”!

इतर राज्यांत ईडीला काम नाही का?

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या कारवाईवरून संतप्त सवाल केला. “बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांत या केंद्रीय तपास यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. तिथे बंदरावर किती मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सापडले होते. आपल्याकडे चिमूटभर सापडलं तर केवढा गहजब केला जातो. आपली तुळशी वृंदावनाची संस्कृती सोडून गांजा वृंदावनची संस्कृती रुजलीये, गांजाची शेती होतेय असं चित्र उभं करायचं. महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू आहे, महाराष्ट्रात गांजाची शेती फुललेली आहे, घराघरात टेरेसमध्ये गांजाच गांजा आहे असं म्हणून महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“प्रत्येकाचे दिवस असात, दिवस बदलतात”

“तुम्ही महाराष्ट्राचा देशासाठी आधार म्हणून उपयोग का करत नाही? महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने राजकारण चाललंय. धाडीमागू धाडी सुरू आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. दिवस बदलतात. ते लवकर बदलतील यासाठी प्रयत्न करू नका”, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.

CM Uddhav Thackeray : पुन्हा भाजपासोबत युती होणार का? उद्धव ठाकरे म्हणतात…

“…तर तुम्ही कपाळ करंटे”

दरम्यान, शिवसेनेकडून परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का? अशी विचारणा केली असता त्यावरून उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि भाजपावर निशाणा साधला. “आम्ही जे प्रयत्न करतोय, ते देशासाठी करतोय. संधी प्रत्येकाला मिळते, त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची, हे ज्याचं त्यानं बघायचं असतं. एवढ्या वर्षांचं स्वप्न साकार झालं, केंद्रात सत्ता मिळाली. ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्या संधीची माती करायची असेल, तर तुम्ही कपाळकरंटे आहात”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.