किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी शिवसैनिकांनी बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येत विशाळगड अतिक्रमणमुक्तचा नारा दिला होता. विशाळगडाकडे कूच करणाऱ्या या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी कोल्हापुरात लढा उभारला आहे.

गडावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत शिवसैनिकांनी विशाळगडकडे जाण्याचा निर्धार केला होता. हातात फावडे व कुदळ घेऊन शिवसैनिक विशाळगडकडे निघाले होते. यापूर्वीच शिवसैनिकांना पोलिसांनी राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी रोखले. या ठिकाणी प्रचंड शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

हेही वाचा: “बोम्मई रोज कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत…”, संजय राऊतांचं टीकास्र; शिंदे-फडणवीसांना केलं लक्ष्य!

पोलिसांनी शिवसैनिकांना रोखल्याने शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडला. पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे यांच्यासह शिवसैनिकांना शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी ताब्यात घेतले. शिवसैनिकांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजी मुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होते.

Story img Loader