शिवसेना म्हणजे मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारा पक्ष अशी प्रतिमा. मराठी माणूस आणि महाराष्ट्र हाच शिवसेनेचा प्रमुख अजेंडा. आता शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात जास्त रस घेत आहे. गोव्यामध्ये भाजपाची ताकत मोठी असताना, भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीसोबत गोव्यात उतरली आहे. शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा शिवसेनेने मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर शिवसेना लढताना दिसत होती. शिवसेना ही शहाराच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. पण हळूहळू मुंबई पासून ठाण्यापर्यत आणि नंतर महाराष्ट्रात ग्रामीण भागात हातपाय पसरू लागली. आणि आता हीच शिवसेना राज्याच्या बाहेर पसरण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेने कंबर कसली असून गोवा आणि उत्तरप्रदेश मध्ये जोमाने लढत आहे. यासाठी खासदार संजय राऊत यांनी जबाबदारी घेतली असून आता आदित्य ठाकरेदेखील मैदानात उतरले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा