राज्यसभेच्या उमेदवारांसाठी झालेले मतदान हे गुप्त मतदान आहे. त्यामुळे कोणी मतदान केलं कोणी नाही त्याबद्दल भाष्य करणे योग्य नाही. त्यामुळे एखाद्याने मतदान केले नाही या निष्कर्षावरून कोणावर तरी आरोप करणं योग्य नाही असं मला वाटतं असे शिवसेनेच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर चाललेल्या खलबतांवर भाष्य केले. आम्हाला जेवढ्या मतांची अपेक्षा होती तेवढे मतदान झालेले नाही. हे जरी खरं असलं तरी आम्हाला मिळालेल्या प्रत्येक मताचा आणि पाठिंब्याचा आम्ही आदर करतो असे त्यांनी म्हटले. पालघरच्या शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दरम्यान त्यांनी राज्यसभेच्या प्रश्नांवर उत्तरे देताना म्हटले आहे.
अमृता फडणवीस यांच्या महाविकास आघाडीला यापुढे आणखीन धक्के लागतील, या वक्तव्यावर गोऱ्हे यांनी भाजपच्या कानपिचक्या घेतल्या. दोन वर्षांपूर्वी भाजपला निवडणुकीत जो धक्का मिळाला. त्यातून ते अजूनही सावरले का याचा आधी त्यांनी विचार करावा, त्यांनी आमच्या धोक्याचा विचार करू नये, असे गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना त्यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना म्हटले.
राज्यसभेच्या निवडणुकीत मतांचे राजकारण करून शिवसेनेला धक्का मिळाला या प्रश्नावर गोऱ्हे यांनी निवडणूकीचा जो निकाल आलेला आहे. त्याच्या मधली नक्की माहिती, असे कशामुळे व काय घडलं किंवा आमच्या बाजूने जे मतदान झाले, त्याचे स्वरूप काय याची माहिती आमच्या पक्षश्रेष्ठीनी घेतली आहे. त्यानुसार काय विश्लेषण करायचं ते पक्ष ठरवेल. भाजपा हे आमचे राजकीय विरोधक आहे. त्यांनी केलेली अशी अनेक वक्तव्ये ही आश्चर्य वाटून घेण्यासारखे नाहीत. आम्ही निवडणुकीत जास्तीत जास्त प्रयत्न केले. राजकारणामध्ये साध्या गोष्टींची माहिती घेऊन त्यात सुधारणा करण्याची संधी असते.जे नुकसान झाले ते परत भविष्यात घडू नये या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील,असे त्यांनी म्हटले.
पडद्याच्या मागे साम-दाम-दंड-भेद याचा उपयोग पालघर मधूनच जाहीर झाला होता. साम-दाम-दंड-भेद याचा एक नवीन अंक आपल्याला बघायला मिळाला. परंतु काही लोकप्रतिनिधींची दिशाभूल झाली असेल किंवा त्यांना काही वेगळ्या पद्धतीची अडचण आली असेल, दबाव आले असतील, यांच्याबाबत पक्ष गांभीर्याने दखल घेईल, यात शंका नसल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. परंतु असंच काही घडलं किंवा कसं त्याच्याबद्दल भाष्य करणे योग्य नसल्याचे सांगून गोऱ्हे यांनी मतफोडीच्या राजकारणावर अधिकचे बोलण्याचे टाळले. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेल्या घोडेबाजाराच्या प्रश्नावरही त्यांनी बोलणे टाळले.
केंद्रामध्ये सरकार भाजपचा आहे. अप्रत्यक्ष- प्रत्यक्ष विकास कामाला सहकार्य होईल किंवा आपल्याला अजून काही मदत मिळेल, केंद्राचे सहकार्य मिळेल, मतदारांच्या विकासासाठी काही प्रकल्प मिळतील अशी भावना काही लोकप्रतिनिधींनी होऊ शकते. त्यामुळे निवडणुकीत अशा घटना होत असतात. शिवसेनेला यामध्ये काहीच कळलं नाही, असे नाही. अशा गोष्टी पक्षाने पचवलेल्या आहे. मात्र हेच लोकप्रतिनिधी शिवसेनेकडे पुन्हा मदत मागायला येतात. कोणी काही बोललं तरी गर्वाने राजकारण करायचं नसते, असा अप्रत्यक्ष टोला गोऱ्हे यांनी बहुजन विकास आघाडीचे नाव न घेता लगावला आहे.