आसाराम लोमटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने निवडून येतो तो खासदार पुढील निवडणुकीत पक्षद्रोह करतो या आजवरच्या इतिहासाला विद्यमान खासदार संजय जाधव यांनी छेद दिला आहे. प्रत्येक वेळी शिवसेनेला लोकसभेसाठी नवा उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर शोधावा लागतो. या वर्षीची निवडणूक त्याला अपवाद ठरली आहे.

युती होईल की नाही, असा संभ्रम शिवसेना व भारतीय जनता पक्ष या दोन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात परभणीसह गंगाखेड, पाथरी, जिंतूर हे जिल्ह्य़ातील विधानसभा मतदारसंघ आहेत. परतूर, घनसावंगी हे जालना जिल्ह्य़ातील दोन विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात.

परभणी हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. १९८९ पासून २०१४ पर्यंत फक्त १९९८चा अपवाद वगळता सात वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. परभणी मतदारसंघ आणि शिवसेना हे समीकरण तयार झाले. शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी या मतदारसंघातून निवडून येणारे खासदार पुढील निवडणुकीत शिवसेनेत राहात नाहीत. अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर अशी ही मोठी मालिका आहे. अगदी गेल्या वेळी गणेश दुधगावकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. या तुलनेत सुरेश जाधव हे विद्यमान खासदार मात्र शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत.

निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली की जालना जिल्ह्य़ातील काही नावे या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी चर्चेला येतात. त्या अनुषंगाने भाजपचे उमेदवार म्हणून पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचीही चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षी लोणीकरांनी सगळी प्रशासकीय यंत्रणा वापरून ‘समाधान शिबीर’ घेतले. जिल्ह्य़ाच्या विकासासाठी भाजपने कोटय़वधी रुपयांचा निधी  आणला हे या वेळी सांगितले गेले. प्रत्यक्षात त्या वेळी भूमिपूजन झालेली रस्त्यांची अनेक कामे अजून सुरूच व्हायची आहेत. स्वतंत्रपणे लोकसभा लढविण्याची भाजपची तयारी अनेकदा पक्षाचे नेतेही बोलून दाखवितात.मात्र भाजपचे कार्यकर्त्यांची यंत्रणा तितकी सक्षम नाही.  जि.प. सदस्य मेघना बोर्डीकर, राजश्री जामगे याही भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.

या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा संघर्ष राष्ट्रवादीशी आहे. मागील निवडणुकीत विजय भांबळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी होती. भांबळे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी जिंतूर विधानसभा मतदारसंघापुरतेच आपले लक्ष केंद्रित केले. सध्या आमदार असलेले भांबळे या वेळी लोकसभेसाठी इच्छुक नाहीत, तसे त्यांनी पक्षनेतृत्वाला सांगितले आहे. गेल्याच आठवडय़ात मुंबईत पक्षनेतृत्वाने घेतलेल्या बैठकीत उमेदवारीच्या अनुषंगाने जी नावे चर्चिली गेली त्यात जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांचे नाव अग्रभागी आहे. लोकसभेच्या अनुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनीही नुकतीच बैठक घेतली. माजी खासदार तुकाराम रेंगे यांच्यासह काही नावे उमेदवारीसाठी पक्षीय पातळीवर असली तरीही आघाडीच्या वाटपात हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोटय़ात आहे. जर वरिष्ठ पातळीवर नेतृत्वानेच अदलाबदल केली तरच हा मतदारसंघ काँग्रेसकडे येईल अन्यथा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच जुना संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळेल. परभणी लोकसभा मतदारसंघात ‘ओबीसी’ मतदारांची संख्या निर्णायक आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या मराठा उमेदवारांच्या मतविभागणीत ‘ओबीसी’ मतदारांचे ध्रुवीकरण करण्याच्या हालचालींनाही प्रारंभ झाला आहे.

विधानसभेतील राजकीय चित्र

चिंतूर – राष्ट्रवादी काँग्रेस</p>

परभणी- शिवसेना

गंगाखेड- राष्ट्रवादी काँग्रेस

पाथरी- अपक्ष

परतूर – भाजप

घनसावंगी – राष्ट्रवादी काँग्रेस

नांदेड-पुणे, नांदेड-पनवेल या नव्या रेल्वेगाडय़ा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला त्याला यश आले. सर्वाना सोबत घेऊन पीकविम्यासाठी केलेल्या आंदोलनांनंतर अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जनआंदोलन उभारले, या महाविद्यालयाची अधिसूचना पुढील आठवडय़ात निघेल. केंद्रीय विद्यालयाची स्थापना ही सुद्धा मोठी उपलब्धी आहे. शहरातील खानापूर आणि धाररोड या दोन्हीही ठिकाणची स्मशानभूमी अतिक्रमण मुक्त करून संरक्षक भिंतीसह विकसित केली आहे. परतूर येथील मराठा क्रांती भवनासाठी २५ लाखांचा निधी दिला आहे. विकासनिधीतून होणाऱ्या नियमित कामांशिवाय जनतेच्या अनेक प्रश्नांवर संघर्ष करून सातत्याने पाठपुरावा केला आहे.

– संजय जाधव, खासदार

परभणी लोकसभा मतदारसंघातील जनतेने सातत्याने शिवसेनेला मते दिली पण शिवसेनेने जिल्हय़ाला काहीही दिले नाही. केवळ जातिधर्माचे राजकारण करून आजवर शिवसेनेने या जिल्हय़ात सत्ता भोगली आहे. खा. संजय जाधव यांच्याही काळात कोणतेच भरीव काम झालेले नाही. शिवसेनेच्या काळात परभणी लोकसभा मतदारसंघात एकही महत्त्वाचा प्रकल्प आला नाही. विकासाबाबतीत कोणतीच कामगिरी नाही, परभणी लोकसभा मतदारसंघाचे चित्र बदलायचे असेल तर जिल्हय़ात सुपीक जमीन सिंचन असे सगळे असताना शिवसेनेने मात्र विधायक कामे करण्याऐवजी केवळ भावना भडकविण्याचे काम केले. जिल्हय़ातल्या तरुणांचा भ्रमनिरास केला.

-आ. बाबाजानी दुर्राणी, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी