वसंत मुंडे, प्रतिनिधी, बीड
रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बाहाण्याने एका २४ वर्षीय विधवा महिलेच्या घरात घुसून एका ऑटोरिक्षा चालकाने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान या कृत्याची चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर ऑटोरिक्षा चालकासह इतर सात जणांकडूनही अत्याचार करण्यात आले.ही घटना बीड शहरात वेगवेगळ्या भागात २०१४ ते ते २०२१ या वर्षांत घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून माजलगाव पोलिसात सात जणांवर १८ मे २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय घडली घटना?
बीडमध्ये एका विधवा महिला तिची पर्स संदीप पिंगळे या रिक्षाचालकाच्या रिक्षात प्रवासादरम्यान विसरली होती.पर्स परत करण्याच्या बहाण्याने पिंगळे याने महिलेला त्याच्या कबाड गल्लीतील (बीड) खोलीवर बोलून घेतले व या ठिकाणी त्यांने तिच्यावर अत्याचार केला.ही घटना २०१४ मध्ये घडली. या रिक्षाचालकाने सदर कृत्याची चित्रफित तयार केली आणि या महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तिच्यावर सातत्याने अत्याचार केला. त्याचप्रमाणे त्याचा नातेवाईक असणाऱ्या गोरख इंगोले सोबतही तिला बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले.पुढे गोरख इंगोलेनेही सतत ब्लॅकमेल करून तिला शारीरिक त्रास दिला.त्यानंतर २०१५ मध्ये गोरख इंगोलेचा भाऊ बालाजी इंगोले यांने ही या गोष्टीचा फायदा घेऊन महिलेस ब्लॅकमेल करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.
२०२० मध्ये गोरख इंगोले यांने जबरदस्तीने पीडित महिलेला मोटर सायकलवर बसउन जरूड ते हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेले, तेथे त्याच्या चार मित्रांकडून आळी पाळीने सहा तास अत्याचार केला.यावेळी महिलेच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता.तरीही अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. २०१४ ते २०२१ या कालावधीत या सात जणांकडून नैसर्गिक आणि अनैसर्गिक पद्धतीने त्या पीडित महिलेवर अत्याचार करण्यात येत होता.त्यानंतर गोरख इंगोले याने जबरदस्तीने गर्भपात करून घेण्यासही पीडित महिलेस भाग पाडले.
हा सर्व छळ त्रास सहन करून पिडित महिला माजलगाव येथे २०२३ मध्ये राहण्यासाठी आली. या ठिकाणी एका रेस्तराँमध्ये मॅनेजर म्हणून ती काम करू लागली.या ठिकाणीही येऊन तिघेजण तिला ब्लॅकमेल करून शारीरिक सुखाची मागणी करू लागले. हा मानसिक,शारीरिक त्रास सहन न झाल्याने शेवटी पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून संदीप पिंगळे रा.कबाड गल्ली बीड, गोरख इंगोले रा.आहेर धानोरा बीड, बालाजी इंगोले आहेर,धानोरा बीड.इतर चार जणाविरुद्ध तक्रार दाखल केल्याने त्यांच्याविरुद्ध भादवी 376(2)(फ),376(2)(ड),376(2)न,377, 504,506,(34),313,66(ई) कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.