सांगली : लोकशाही दिनानिमित्ताने तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रकार सोमवारी घडला. या प्रकारामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून, मुख्यालयासमोर ठिय्या मारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “रिक्षावाल्याच्या हाताखाली…”, शरद पवारांचा उल्लेख करत सावंतांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

हेही वाचा – “पुढच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन भाषण करणार” असं का म्हणाले अजित पवार?

सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात सदरचा प्रकार घडला. गुंठेवारीची फाईल मंजूर न झाल्याने संतापून संबंधित व्यक्तीने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. कैलास बजरंग काळे, असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने नियमितीकरणासाठी गुंठेवारी प्रस्ताव २०१२ मध्ये दिला होता. २०२१ मध्ये शासन शुल्क वाढ झाली होती. पण नवीन दराने शुल्क वाढ देण्यास त्याने नकार दिला. यामुळे त्याने आततायी कृत्य केले. तक्रारदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoes thrown at sangli mnc commissioner employees protest ssb
Show comments