पश्चिम रेल्वेवरील जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून चौघांचा खून केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) बडतर्फ जवान चेतन सिंह चौधरी याच्याविरोधात बोरिवली रेल्वे पोलिसांनी २० ऑक्टोबरला आरोपपत्र दाखल केले. बोरिवलीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हे एक हजार ९७ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात चेतन सिंह चौधरीच्या पत्नीसह १६९ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेतन सिंह चौधरीची पत्नी प्रियंकानं आरोपपत्रात धक्कादायक खुलासे केले आहेत. “मी तीन लोकांचा खून केला आहे… माझ्याकडून मोठी चूक झाली. मी स्वत:वरही गोळी झाडून घेऊ का?” असं चेतन फोन करून बोलल्याचं प्रियंका म्हणाली. तसेच, चेतनला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगितल्याचं प्रियंकानं म्हटलं.

हेही वाचा : विश्लेषण: मानसिक आजारग्रस्त चेतन सिंहकडे शस्त्र कसे?

“चेतनच्या मेंदूत रक्ताची गाठ होती. त्यासाठी तो औषधही घेत होता,” असंही प्रियंकानं सांगितलं आहे.प्रियंका चौधरी

आरोपपत्रात म्हणाली, “चेतनचे वडील आरपीएफमध्ये होते. २००७ साली कर्तव्यावर असताना त्याचं निधन झालं. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या जागी चेतन आरपीएफमध्ये उज्जैन येथे रूजू झाला. २०१८ साली गुजरातमध्ये चेतनची बदली झाली. नंतर यावर्षी एप्रिलमध्ये चेतनची मुंबईत बदली झाली होती.”

“गुजरातमध्ये असताना पोरबंदर येथे चेतनची आई त्यास भेटण्यास गेली होती. तेव्हा चेतनच्या स्वभाव बदलेला दिसला. चेतनच्या आईनं सांगितल्यानुसार, तो अचानक बडबड करायचा आणि भिंतीवर डोके आपटत असे,” असं प्रियंकानं म्हटलं.

हेही वाचा : अन्वयार्थ : द्वेषाचा क्रौर्यावतावर

“१३ फेब्रुवारीला २०२३ ला चेतनला उत्तर प्रदेशातील मथुरामधील न्यूरोसर्जनकडे तपासण्यासाठी नेलं होतं. प्राथमिक चाचणीनंतर चेतनच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचं समोर आलं होतं,” असं प्रियंका म्हणाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should i shoot myself too ex railway chetan singh chaudhari asked wife after killing 4 un train ssa