श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. श्रद्धाचा जखमी अवस्थेतील फोटो समोर आल्यानंतर आफताब तिला नेहमी मारहाण करत असल्याचं समोर आलं आहे. श्रद्धाने मित्रांसह केलेल्या चॅटमधून अनेक गोष्टींचा खुलासा आहे. दरम्यान, या हत्याकांडात आफताबचं कुटुंबही सहभागी होतं अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यातच आता श्रद्धाच्या वडिलांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना एक नवा खुलासा केला आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले असता आफताबच्या कुटुंबाने आपला अपमान केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“दिल्ली आणि वसई पोलिसांनी माझा जबाब नोंदवला आहे. मी श्रद्धाला फोन करायचो, पण फार कमी बोलणं व्हायचं,” अशी माहिती श्रद्धाच्या वडिलांनी दिली आहे.

Nagpur It is now possible to know status of autopsy report in AIIMS with click police as well as family
एम्समधील शवविच्छेदनाची स्थिती आता एका ‘क्लिक’वर, पोलीस, नातेवाईकांची पायपीट थांबणार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Worli accident case, Mihir Shah , High Court ,
वरळी अपघात : मिहीर शहावर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवण्याची मागणी, उच्च न्यायालयाने घेतली दखल
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Beed sarpanch murder case Walmik Karad charged under MCOCA in Marathi
Walmik Karad MCOCA : मोठी बातमी! वाल्मिक कराडवर मकोका; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणी ग्रामस्थांचा सरकारला अल्टिमेटम; म्हणाले, “उद्या सकाळी १० वाजेपर्यंत…”
धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

Shraddha Murder Case: किचनमध्ये रक्ताचे डाग, नाल्यात हाडं; आफताबच्या फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीमला काय सापडलं?

दरम्यान लग्नाची बोलणी करण्यासाठी आफतबाच्या घरी गेल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की “पत्नी जिवंत असताना फक्त एकदा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. उलट त्याच्या नातेवाईकांनी आमचा अपमानही केला होता. इथे परत यायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं”. ऑगस्ट २०१९ मध्ये ही भेट झाली होती असं त्यांनी सांगितलं आहे.

Shraddha Murder Case: तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण…; मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

“आम्हाला त्याच्या कुटुंबीयांकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता. पत्नीच्या निधनानंतर फार काही विचार डोक्यात आला नाही. मी श्रद्धाला लग्न न करण्यासाठी समजावून सांगितलं होतं, पण तिने काही ऐकलं नाही. आफताबने तिला काय सांगितलं होतं माहिती नाही,” असं त्यांनी सांगितलं. त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय का घेतला याची मला कल्पना नसल्याचं ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. आरोपी प्रियकर आफताब पूनावाला याने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे.

श्रद्धाने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची खून केल्याचं तपासात उघड झालं आहे. कुटुंबीयांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत वास्तव्यास आले होते. पोलिसांनी आरोपी पूनावाला याला अटक केली आहे.

Shraddha Walkar Murder: “आफताबचे ते शब्द ऐकून मी खालीच कोसळलो…”, श्रद्धाच्या वडिलांनी मांडली व्यथा

चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांसमोर काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावणं कठीण असल्याने आपण त्याचे तुकडे करण्याचं ठरवलं. यासाठी आपण इंटरनेटची मदत घेतली. आपला आवडता टीव्ही शो ‘डेक्स्टर’मुळे आपल्याला मदत झाली असं त्याने सांगितलं आहे.

आफतबाने सर्वात आधी ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला. त्याने काही वर्षांपूर्वी शेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं. त्या कौशल्याचा फायदा त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला. कोणलाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले.

PHOTOS: मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आफताब रोज श्रद्धाचा चेहरा पाहायचा, धक्कादायक खुलासे ऐकून पोलीसही चक्रावले

मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने ते सर्व फ्रीजमध्ये ठेवले. सोबतच डझनभर डिओड्रंट, परफ्यूम आणि सुंगंधी काड्याही भरल्या.पुढील १६ दिवस आफताब मृतदेहाची विल्हेवाट लावत होता. रोज रात्री २ वाजता तो मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरुन घराबाहेर पडत असे. रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा जंगलाच्या भागात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत असे. कचरा वेचणाऱ्यांना शंका येऊ नये यासाठी तो त्याचे आणखी छोटे तुकडे करत असे. मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसऱ्या ठिकाणी फेकून देत होता.

Story img Loader