राज्यात पावसाअभावी शेतीची अवस्था बिकट आहे. मुख्यमंत्री शेतात दोन-दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात, अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. याला शिवसेना ( शिंदे गट ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अडीच वर्षात सरकार कारभार कशाप्रकारे हाकला. हा प्रश्न त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे, असं टीकास्र श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सोडलं आहे. ते डोंबिवलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर, इगतपुरी येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. “राज्यात पावसाअभावी शेतीची अवस्था बिकट आहे. मुख्यमंत्री शेतात दोन-दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात. विमान वापराच्या नियमात बदल करण्यात आला असून, घरच्या कामासाठी शासकीय विमान वापरतात,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे-पाटलांना उपोषणास बसवलं, तर फडणवीसांनी…”, काँग्रेसचा गंभीर आरोप

“तत्कालीन मुख्यमंत्री फक्त अडीच दिवस मंत्रालयात”

आदित्य ठाकरेंनी हेलिकॉप्टरवरून मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारल्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, “सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेले. अडीच वर्षात कशाप्रकारे सरकारचा कारभार हाकला, हा प्रश्न तर त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे.”

हेही वाचा : ठाकरे गटातील खासदाराकडून राहुल नार्वेकरांचा ‘सरडा’ असा उल्लेख; म्हणाले, “अनेक पक्षांचे रंग…”

“साडेबारा हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांना दिला”

“संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यात ६० हजारांहून अधिक कोटी रुपयांचं पॅकेज मराठवाड्यासाठी घोषित करण्यात आलं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठवाड्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले. गेल्या सव्वा वर्षात एनडीआरफचे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं. साडेबारा हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी शेतकऱ्यांना दिला,” असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

“लोकांना टीका नको तर काम हवं”

“एसटीत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना ५० टक्के सवलत असे निर्णय सरकारने घेतले. खालच्या पातळीवर टीका केली जाते. लोकांना टीका नको तर काम हवं आहे. तळागळातील व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी हे सरकार काम करत आहे,” असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.