Shrinivas Pawar on Ajit Pawar Claims Over Family and Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यापासून दोन्ही गटांमधील नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्ये केल्यामुळे, प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे पवार कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, आज अजित पवारांनी पुन्हा एकदा कौटुंबिक गोष्टी जाहीर सभेत बोलून दाखवल्या. अजित पवार यांनी आज (२८ ऑक्टोबर) बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर कन्हेरी येथील प्रचारसभेला संबोधित केलं. या सभेत भाषण करताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीवेळी माझी चूक (सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं) झाली, तीच चूक आता वरिष्ठ (शरद पवार) करत आहेत”. त्यावर, अजित पवारांचे थोरले भाऊ श्रीनिवास पवार म्हणाले, “चूक व्हायच्या आधी आम्ही त्यांना सांगत होतो. त्यांनी तेव्हाच ते थांबवायला पाहिजे होतं. आता झालं गेलं ते त्यांनी सोडून द्यायला हवं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा