Shrinivas Pawar Sharayu Toyota Search Operation : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील आणि शरद पवारांचे पुतणे श्रीनिवास पवार यांच्या शरयू टोयोटा कंपनीत निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री तपासणी केली. निवडणुकीच्या तोंडावर ही तपासणी करण्यात आल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर म्हणाले, “शरयू टोयोटामध्ये पैशांचं वाटप सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आम्ही तपासणी केली. परंतु, या तपासणीत तसे कोणतेही तथ्य आढळून आले नाही.”

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Chhagan Bhujbal alleges Sharad Pawar who broke the Shiv Sena in 1991
१९९१ मध्ये शरद पवार यांनीच शिवसेना फोडली; छगन भुजबळ यांचा आरोप
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
maharashtra assembly election 2024 fight between Rohit Pawar and Ram Shinde will be significant
रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील लढत लक्षणीय
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित

हेही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : “विरारमध्ये विनोद तावडेंकडून पैसे वाटप, मला २५ कॉल्स”, हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप

दरम्यान, याप्रकरणी बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “काल रात्री साडेदहा वाजता ते आले. १०- १२ लोकांचं पोलीस स्क्वाड आले होते. आमचा शरयू टोयोटो म्हणून लहान व्यवसाय आहे. तिथे त्यांनी चेक केलं. पण त्यांना काही मिळालं नाही. आम्ही कायदा पाळणारे लोक आहेत. यापुढेही आम्ही त्यांना सहकार्य करू.”

श्रीनिवास पवार काय म्हणाले?

“तीन-चार पोलीस आणि पाच-सहा सरकारी अधिकारी होते. रात्रीचं शोरूम बंद असतं. पण ते आले आणि म्हणाले की तक्रार आली आहे. तक्रार कुठून आलीय हे त्यांनी सांगितलं नाही. शोरुममधील कर्मचाऱ्यांनी त्यांना आतमध्ये नेलं. त्यांनी आतमध्ये तपासलं असता त्यांना काहीही सापडलं नाही. निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी घडत असतात”, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास पवार यांनी दिली.

बारामतीत हायवोल्टेज ड्रामा

राज्यातील विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघ हायवोल्टेज मतदारसंघ ठरला आहे. कारण, या मतदारंसघातून सख्खे काका-पुतणे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार या मतदरासंघातून मैदानात आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.