Shrinivas Pawar Yugendra Pawar Father’s Cars showroom raid : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (२० नोव्हेंबर) एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे. संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी बारामती मतदारसंघात काय निकाल लागतो याकडेली देशाचं लक्ष आहे. कारण या मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या सामना रंगणार आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार) तर युगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकीटावर ही निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, सोमवारी (१८ नोव्हेंबर) निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. युगेंद्र पवारांनी मतदारसंघात पैसे वाटल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर रात्री युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू मोटर्समध्ये निवडणूक अधिकारी व पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी शोरूमध्ये पैसे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. या धाडीनंतर श्रीनिवास पवारांनी एएनआयला सांगितलं की “शोरूममध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार आढळले नाहीत”.

श्रीनिवास पवार म्हणाले, “तीन ते चार पोलीस व पाच ते सहा निवडणूक अधिकाऱ्यांचं पथक रात्री आमच्या शोरूमवर धडकलं. शोरूम त्यावेळी बंद होतं. त्यांनी सांगितलं की आम्हाला शोरूमची तपासणी करायची आहे. तुमच्याविरोधात तक्रार प्राप्त झाली आहे, असं कारण त्यांनी दिलं. त्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी शोरूम उघडून दिलं. त्यांनी शोरूमची तपासणी केली, कार्यालय तपासलं. त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही आणि आम्हीदेखील त्यांना काही विचारलं नाही. त्यानंतर ते तिथून निघून गेले. ते (महायुती) सध्या सत्तेत आहेत. त्यांना जे करायचं आहे ती गोष्ट ते करू शकतात”.

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dance video Uncle aunty dance went viral on social media
काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Young man dances on madanmajiri song from phullwanti marathi movie video viral on social media
“ती नजर, ती अदा…”, प्राजक्ता माळीच्या मदनमंजिरी गाण्यावर थिरकला तरुण, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकीत
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Uncle dance video went viral on social media
काकांचा नाद करायचा नाही ! हळदीत काकांनी धरला जबरदस्त ठेका, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक

हे ही वाचा >> नालासोपाऱ्यातील कथित पैसेवाटपप्रकरणी निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर, मोठ्या कारवाईची शक्यता; निवडणूक अधिकारी म्हणाले…

श्रीनिवास पवार काय म्हणाले?

युगेंद्र पवार यांचे वडील म्हणाले, “शोरूमवर धाड टाकणाऱ्या लोकांना विचारलं की कोणी तक्रार केली होती? यावर त्यांनी सांगितलं, ‘आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला आदेश आले की या शोरूमची तपासणी करावी लागेल. त्यानंतर आम्ही इथे आलो आहोत’. ते अधिकारी अर्धा-पाऊण तास शोरूमची, तिथे असलेल्या सर्व वाहनांची तपासणी करत होते. ते खरंच शासकीय अधिकारी होते की नव्हते हे आम्हाला समजू शकलं नाही. आम्ही त्यांचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आम्हाला चित्रीकरण करू दिलं नाही. ते मात्र शोरूमचं चित्रीकरण करत होते. सर्व वाहनं उघडून तपासत होते.

हे ही वाचा >> Anil Deshmukh : अनिल देशमुख हल्ला प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, पोलीस म्हणाले…

अजित पवारांबद्दल काय म्हणाले?

श्रीनिवास पवार म्हणाले,”याआधी कधी असं झालं नव्हतं. मात्र, पक्ष फुटले, आमचे भाऊ भाजपाबरोबर गेले आहेत. ते भाजपाकडून अशा गोष्टी शिकत आहेत. पक्ष वेगळे झाल्यानंतर अशा गोष्टी होऊ लागल्या आहेत”.

Story img Loader