Shrinivas Pawar Yugendra Pawar Father’s Cars showroom raid : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (२० नोव्हेंबर) एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे. संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी बारामती मतदारसंघात काय निकाल लागतो याकडेली देशाचं लक्ष आहे. कारण या मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या सामना रंगणार आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार) तर युगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकीटावर ही निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, सोमवारी (१८ नोव्हेंबर) निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. युगेंद्र पवारांनी मतदारसंघात पैसे वाटल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर रात्री युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू मोटर्समध्ये निवडणूक अधिकारी व पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी शोरूमध्ये पैसे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. या धाडीनंतर श्रीनिवास पवारांनी एएनआयला सांगितलं की “शोरूममध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार आढळले नाहीत”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा