श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर येथे मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात २२ किलो वजनाचा घोळ मासा सापडला. या माश्याची लिलावात तब्बल २ लाख ६१ हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यामुळे हा मासा पकडणारे मच्छीमार चांगलेच मालामाल झालेत. जीवना बंदरावरील मच्छिमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत चुनेकर व नितीन पाटील हे समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. जाळी लावून बसले असतांना, जाळ्यात मोठा मासा अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा मासा सुटण्यासाठी धडपड करत होता, ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने जाळी वर ओढली आणि जाळीसोबत माश्याला किनाऱ्यावर घेऊन आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in