नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. ही सगळी देवेंद्र फडणवीस यांची खेळी आहे अशी चर्चा सुरू झाली त्यानंतर शुभांगी पाटील यांनी आपणीही निवडणुकीला उभं राहात असून उद्धव ठाकरे यांना भेटले आहे त्यांनी मला पाठिंबा देऊ असं आश्वासन दिलं आहे. आता त्याच नॉट रिचेबल आहेत. एकीकडे काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोनही लागत नाहीये. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय ट्विस्ट अँड टर्न येणार हे येत्या काळात अधिक स्पष्ट होत जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा