जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवरील अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ बुधवारी इचलकरंजी बंदला सकाळपासून सुरुवात झाली. काल कोल्हापुरात सकल मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील दुसरी महापालिका असलेल्या इचलकरंजी या औद्योगिक शहरातील बंदलाही प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाने दिलेल्या हाकेला व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनी प्रतिसाद दिला.

शहरात मराठा संघटनांकडून शहर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला सांगली शहररात जोरदार प्रतिसाद मिळाला. सनदशीर मार्गाने सर्व संघटनांकडून मारहाणीचा निषेध व्यक्त केला गेला. अत्यावश्यक सेवा वगळून इचलकरंजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुकाने, व्यापार-व्यवसाय बंद राहिल्याने नेहमीच्या गजबजलेल्या ठिकाणी वर्दळ नसल्याने शांतता होती. औषध दुकाने सुरू होती.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल

हेही वाचा – Petrol-Diesel Price on 6 September: आज राज्यात पेट्रोल-डिझेलचा दर किती? जाणून घ्या

कार्यकर्ते रस्त्यावर

बंदला प्रतिसाद मिळावा याकरिता सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या अन्य समाजाचे कार्यकर्ते बुधवारी सकाळपासून रस्त्यावर उतरले होते. त्यांनी दुचाकीवरून रॅली काढून दुकाने व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. आधीच सर्व दुकाने बंद होती. काही किरकोळ लोकांनी सुरू होती तीही या रॅलीनंतर बंद करण्यात आली. शहरातील मुख्य मार्ग, नारायण पेठ, सरस्वती मार्केट येथील व्यवहार पूर्णतः बंद होते.

हेही वाचा – मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार, मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण सुरुच

एसटी बंद

दरम्यान कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य बसस्थानकामध्ये प्रवेश केला. त्यांनी एसटी वाहतूक बंद ठेवावी, असे आवाहन केले. त्यानंतर सुरू असणारी सर्व एसटी वाहतूक बंद झाली. प्रवाशांना पर्यायी वाहनांचा शोध घ्यावा लागला.