सहा वर्षांपासून विनावापर; प्रत्येक मजल्यावर झाडेझुडपे
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सुमारे दोन कोटी ३२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले अद्ययावत स्वरूपाचे यात्री निवास गेल्या सहा वर्षांपासून विनावापर पडून आहे. सुमारे ३६ हजार चौरस फुटांचे बांधकाम क्षेत्र असलेल्या यात्री निवासाच्या प्रत्येक मजल्यावर मोठय़ा प्रमाणात झाडीझुडपे वाढल्यामुळे संपूर्ण इमारतच धोक्यात आली आहे. या इमारतीचा वापर हागणदारीसाठी होऊ लागला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी २००४ साली राज्य शासनाकडून सिध्देश्वर यात्री निवासाच्या उभारणीसाठी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला होता. राज्य शासनाने ५० टक्के, तर सोलापूर महानगरपालिका व सिध्देश्वर देवस्थान समितीने प्रत्येकी २५ टक्के निधी देऊन सिध्देश्वर पेठेत पंचकट्टय़ाजवळ मोक्याच्या ठिकाणी यात्री निवास उभारण्यात आले आहे.
युवराज चुंबळकर या कंत्राटदाराने २००८ साली यात्री निवासाचे बांधकाम हाती घेऊन २०१० साली पूर्ण केले. तळमजला सोडून तीन मजली असलेल्या या यात्री निवासात १३ अद्ययावत खोल्यांसह कॅन्टीन, डायनिंग हॉल अशा सुविधा असलेल्या या यात्री निवासात एकावेळी सुमारे ३५० भक्तांची निवास व्यवस्था होऊ शकते. शिवाय तळमजल्यात पाच व्यापारी गाळ्यांचे नियोजन आहे. महापालिकेने यात्री निवासासाठी मलनिस्सारणाचे काम पूर्ण करून दिले आहे.
यात्री निवास पूर्ण झाल्यानंतर त्याचा ताबा सिध्देश्वर देवस्थान समितीकडे द्यावयाचे ठरले होते. परंतु, यात्री निवासाची उभारणी होऊन सहा वर्षे उलटली तरी सिध्देश्वर देवस्थान समितीने त्याचा ताबा अद्यापि घेतलेला नाही. यात्री निवासालगत मुख्य रस्त्याला खेटून खासगी व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. ही जागा मोकळी करून द्यावी, असा देवस्थान समितीचा आग्रह आहे. व्यापाऱ्यांची दुकाने हटविण्याच्या कामात कायदेशीर अडसर असल्यामुळे हा प्रश्न कायम आहे.
यात्री निवास बांधल्यानंतर त्याठिकाणी उद्वहनाची तसेच जलकुंभासह इतर सोयी उपलब्ध कराव्या लागणार आहेत. त्यासाठी सुमारे ३५ लाखांचा खर्च अपेक्षित असून, त्याकरिता शासनाकडे पाठपुरावा होत असल्याचे सिध्देश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचे म्हणणे आहे. या प्रश्नाकडे सिध्देश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी असलेले पालकमंत्री विजय देशमुख यांचे लक्ष वेधले असता, सिध्देश्वर येत्या आठ दिवसांत यासंदर्भात शासन स्तरावर बैठक बोलावून अडचणी सोडविल्या जातील व यात्री निवासाचा वापर लवकरात लवकर होण्यासाठी जातीने लक्ष घालू, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण यांनीही याप्रकरणी नेमकी अडचण कोणती आहे, याची चौकशी करून कार्यवाही केली जाणार असल्याचे नमूद केले.