Siddhi Kadam : मोहोळ मतदारसंघातून रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम ( Siddhi Kadam ) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र नंतर शरद पवारांनी एक दिवसातच निर्णय बदलत राजू खरे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर रमेश कदम आणि सिद्धी कदम या दोघांनीही अर्ज भरला होता. मात्र आज त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राजू खरेंना दिलासा मिळाला आहे. राजू खरे यांना उमेदवारी दिल्याने सिद्धी कदम आणि रमेश कदम नाराज झाले होते त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज अखेर या दोघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

रमेश कदम काय म्हणाले?

सिद्धी कदम ( Siddhi Kadam ) यांना मोहोळमधून उमेदवारी दिली होती. मात्र काही कारणास्तव ही उमेदवारी बदलण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. त्या नाराजीचा सूर असाच होता की अपक्ष निवडणूक लढवली. त्यावर आम्ही संवाद मेळावाही घेतला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मुलीला आणि मला सन्मान दिला. त्यामुळे मी माझा जो उमेदवारी अर्ज भरला होता तसंच सिद्धीचाही उमेदवारी अर्ज भरला होता. हे दोन्ही अर्ज आम्ही मागे घेतले आहेत. असं रमेश कदम यांनी म्हटलं आहे.

Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : “दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना…”, काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सतेज पाटील संतापले
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? बाळासाहेब थोरातांचं उत्तर, “आम्ही…”
Rashmi SHukla on Sharad Pawar
Rashmi Shukla Transferred : रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची प्रतिक्रया, म्हणाले, “आता त्या…”
Swakruti Sharma
Swikriti Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीम शर्मांच्या पत्नीला एकनाथ शिंदेंकडून विधान परिषदेची ऑफर, उमेदवारी घेतली मागे
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

राजू खरेंचा प्रचार करणार का?

राजू खरे यांचा प्रचार तुम्ही करणार का? असं विचारलं असता रमेश कदम म्हणाले, मी कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका काय? ते आम्ही ठरवू. आम्ही अपक्ष लढलं पाहिजे ही कार्यकर्त्यांचीच भावना होती. मात्र मी त्यांना रविवारी समजावून सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो विश्वास दाखवला तो महत्त्वाचा आहे. त्यामुळेच आम्ही दोघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतला. असं रमेश कदम म्हणाले.

कोण आहेत सिद्धी कदम?

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या महिला उमेदवार ठरल्या होत्या. मोहोळ मतदार संघात सिद्धी कदम यांचा सामना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने यांच्याशी झाला असता. मात्र त्यांचं नाव बदलून ही उमेदवारी राजू खरेंना देण्यात आली आहे. या मतदारसंघात राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सिद्धी कदम यांचं वय अवघं २७ वर्षे आहे.

Story img Loader