श्री ऋषी संस्कृती विद्या केंद्र या स्वयंसेवी संस्थेतर्फे येथे १३ ते २७ जानेवारीदरम्यान इंदिरानगर व शालिमार येथील नाशिक जिमखाना सिद्ध समाधी योग वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ताणतणावातून आनंदाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे सिद्ध समाधी योग आहे. विचारग्रस्त व तणावाखाली असणाऱ्या मनाला शांत करण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धती म्हणजे हा योग आहे, असे संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते सुहास फडके यांनी म्हटले आहे. इंदिरानगर येथील मोदकेश्वर मंदिराजवळ सकाळी सहा वाजता, तर नाशिक जिमखाना येथे सायंकाळी साडेसहा वाजता हा वर्ग होईल. हसण्याची, रडण्याची, गाण्याची, नृत्याची क्षमता म्हणजे हा योग असून १४ वर्षे वयोगटापुढील कोणीही त्यात सहभागी होऊ शकतो. यातून मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, निद्रानाश, आम्लपित्त, स्थूलता, हृदयविकार या आणि अशा प्रकारच्या मानसिक तणावामुळे होणाऱ्या विकारांवर आराम पडू शकतो, असे फडके यांनी म्हटले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी हेतल दीक्षित ९८९०७००७०६ अथवा योगिता अमृतकर ०२५३-२३७९००० यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा