रेल्वेच्या वतीने सोडण्यात येणाऱ्या जयपूर-यशवंतपूर साप्ताहिक गरीब रथ व जयपूर- लोकमान्य टिळक टर्मिनन्स या गाडय़ा पुणेमार्गे सोडण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
यशवंतपूर-जयपूर-यशवंतपूर या मार्गावर साप्ताहिक गरीब रथ ही गाडी ६ ते २५ जानेवारी या कालावधीत सोडण्यात येणार आहे. प्रत्येक रविवारी ही गाडी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी यशवंतपूरहून सुटेल. ती प्रत्येक सोमवारी पहाटे सव्वाचारला पुण्यात येईल. प्रत्येक मंगळवारी दुपारी तीन वाजता ही गाडी जयपूरहून निघेल. पुण्यात ती प्रत्येक बुधवारी दुपारी साडेतीनला येईल.
सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनन्स ही गाडी साप्ताहिक सुपरफास्ट गाडी आहे. सिकंदराबादहून प्रत्येक रविवारी रात्री दहा वाजता ही गाडी सुटणार आहे. पुण्यात ही गाडी प्रत्येक सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता येईल. टिळक टर्मिनन्सवरून ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री अकरा वाजून तीन मिनिटांनी सिकंदराबादसाठी सुटून पुण्यात प्रत्येक मंगळवारी रात्री दोन वाजता येईल.

Story img Loader