वाई : पुणे बंगलोर महामार्गावर भुईंज जीशीविहीर (ता. वाई) दरम्यान असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबलेल्या खाजगी ट्रॅव्हल्समधून ११ लाख ६४ हजार रुपये किंमतीची २५ किलो चांदी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना भुईंज (ता. वाई) हद्दीत घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तळंदगे (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ) येथून ट्रॅव्हल्समधून कोल्हापूरहून पुण्याला निघालेले विजय रघुनाथ चोपडे (वय ४३) हे २५ किलो चांदीचे दागिने घेऊन जात होते. सकाळी सदर ट्रॅव्हल्स नाष्ट्यासाठी हॉटेलसमोर थांबलेली होती. सर्व प्रवाशांप्रमाणे फिर्यादी विजय चोपडे हेसुद्धा नाष्ट्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी पिशवी बसलेल्या खुर्ची शेजारीच ठेवली होती. ते जेव्हा नाष्टा करून परत बसमध्ये आले तेव्हा ती पिशवी त्यांना आढळून आली नाही.

हेही वाचा – “…अन् आता टीकोजी राव फणा काढून बसले”; शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याकडे चौकशी केली व त्यानंतर त्यांनी भुईंज पोलिसात तकार दाखल केली. चोरीस गेलेल्या पिशवीमध्ये २५ किलो चांदीचे लहान मुलांचे व महिलांचे पैंजन दागिने होते ज्यांची किंमत ११ लाख ६४ हजार इतकी असून, ते पुणे येथे आपल्या जावयाकडे घेऊन निघाले होते. याची नोंद भुईंज पोलिसात झालेली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रनदीप भंडारे करीत आहेत.