यंदा रंगपंचमीवर दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचे सावट दिसून आले. तुरळक ठिकाणी पाण्याचा वापर वगळता शहरात रंगपंचमी कोरडी व साधेपणानेच साजरी झाली. सलग दोन वर्षांपासून कमी झालेल्या पावसामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सबंध जिल्ह्य़ातील गावोगावचे नागरिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असून माणसांप्रमाणेच जनावरे, पशुपक्षी व वन्यप्राण्यांचे पाण्यावाचून तीव्र हाल होत आहेत. ग्रामीण भागामध्ये घागरभर पाणी मिळविण्यासाठी जीवाचा मोठा आटापीटा व रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. त्यामुळेच या गंभीर पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर होळीनंतर येणारे धुळवड व रंगपंचमी हे उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सर्वच पक्ष आणि संघटनांनीही केले होते. नागरिकांनी रंगपंचमी दिवशी होणारा पाण्याचा अपव्यय टाळला.
शहराच्या काही रसायनमिश्रीत, भडक आणि शरीराला त्रासदायक ठरणाऱ्या रंगाचा वापर रंगपंचमीत अपवादानेच होता. बाजारपेठेतील दुकाने बंद होती. आठवडी बाजारात तुलनेने फारच कमी गर्दी असल्याचे दिसत होते. पाण्याचे महत्त्व ओळखून तरुणाईने रंगपंचमी साजरी केली. लहान मुलांमध्ये रंगपंचमीचा उत्साह होता.  पाण्याअभावी यंदा फिकी ठरलेली रंगपंचमी व्यापाऱ्यांसाठीही नुकसानीचीच ठरली. रंगपंचमीबाबत नागरिकांत उत्साह नसल्यामुळे रंगाची मागणीही दरवर्षीप्रमाणे झाली नाही. व्यापाऱ्यांनी रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे रंग बाजारपेठेत उपलब्ध केले होते. मागणी नसल्याने रंगांची दुकाने ओस पडल्याचे चित्र होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळजाभवानी मंदिरातही रंगपंचमी कोरडीच
तुळजाभवानीच्या पुजेनंतर सकाळी अकराच्या सुमारास शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या तुळजाभवानी मातेला गुलाबी रंग अर्पण केला. अनेक वर्षांपासून सुरू असलेली रंगपंचमी यंदाही साजरी करण्यात आली. सकाळी नित्याभिषेक झाले, देवीची नित्योपचार पूजा, आरती पार पाडली. दरवर्षीप्रमाणे मंदिर परिसरात प्रथा व परंपरेनुसार रंगपंचमी साजरी झाली. मंदिरात दरवर्षी कोरडाच रंग खेळला जातो.