फेंगल चक्रिवादळाचा तडाखा समुद्रकिनारी भागात बसला असून गुलाबी थंडी अचानक गायब झाली आहे. तसेच आज सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ व ४ डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला असून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची, ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची व गडगडाट होवून विजा चमकण्याची शक्यता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आलेली आहे.
मागच्या २४ तासात पुन्हा थंडीचा जोर ओसरला आहे. फेंगल चक्रिवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसून येत आहेत. फेंगल चक्रिवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर मोठा परिणाम दिसत आहे. ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा – VIDEO : लोणावळ्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रिमझिम पावसाच्या सरी बरसतील, ३ आणि ४ डिसेंबर रोजी पावसाचा जोर वाढेल. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार खुष दिसत असतानाच अचानक हवामानातील बदल झाला. त्यामुळे मोहर टिकविण्यासाठी बागायतदार यांना तारेवरची कसरत करत औषधे फवारणी करावी लागेल.
© The Indian Express (P) Ltd