सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे शंभर मीटर अंतरावर अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे, वरचीवाडी येथील चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या सुचिता सुभाष सोपटे (वय ५९) हिचा असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच तिला मारून जाळून टाकणारा संशयीत पोलिसांना सापडला आहे. त्याचे नाव पितोरिन फर्नांडिस (वय ४२, रा. वेंगुर्ले,) असे आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाने वेगाने तपास सुरू करून मृतदेहाची ओळख पटवून संशयीताला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.पोलिसांना घटनेच्या पार्श्वभूमीवर जसे घटनेचे धागेदोरे मिळत गेले तसे जळीत महिलेची ओळख देखील पटली. त्यानंतर अगदी काही तासांतच आरोपी देखील सापडला आहे. मात्र, या घटनेची पार्श्वभूमी पाहिली तर आणखी काहींचा समावेश असेल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.कारण त्या महिलेला पहिले मारण्यात आले त्यानंतर तिला ओसरगाव येथे आणून तीला जाळण्यात आले. हे एकटी व्यक्ती करू शकत नाही असा संशय पोलिसांना आहे .त्यामुळे या घटनेची माहिती पोलिस घेत आहेत.

मृत महिला आणि संशयीत आरोपीच्या मोबाईल सिडीआर रिपोर्ट नंतर काही गोष्टींचा उलगडा होईल .जळालेली महिला ही घटनेच्या आदल्या दिवशी पासून बेपत्ता होती. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने कट रचला आणि विवाहितेचा काटा काढला असा अंदाज आहे. दरम्यान तिच्याकडे असणारे दागिने कि अन्य काही कारणांमुळे तिचा खून करून जाळण्यात आले त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मृत महिला आणि संशयीत आरोपी या दोघांच्या मोबाईल सीडियर रिपोर्ट पोलिस तपासणार आहेत. या दरम्यान आणखी कोणी संपर्कात होते किंवा कसे? हेही तपासले जाणार आहे.

मयत आणि संशयीत या दोघांना एका पांढऱ्या कारसह कोल्हापूर येथे एका व्यक्तीने पाहिले होते त्यामुळे ही घटना घडण्यापूर्वी ती कोल्हापूर येथे गेली होती का? त्याचा तपास देखील पोलीस करीत आहेत. कुटुंबीयांकडे केलेल्या चौकशीत देखील कोल्हापूरचा संदर्भ आला असून मृत्यूपूर्वी फोन सुरू असताना तिने कुटुंबीयांना दिलेल्या माहितीत देखील विसंगती आढळून आली होती. त्यामुळे तिला एवढ्या निर्दयीपणे का ठार मारण्यात आले याचा तपास देखील पोलीस करीत आहेत.

या विवाहीत महिलेच्या मुलीने अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेहाच्या पायात पैजण पाहिली,ती आपल्या आईची असल्याचे ओळखले आणि त्यानंतर पोलिसांची चक्रे वेगाने फिरली. या दरम्यान दागिने घेऊन बेळगाव येथे जाणाऱ्या सशयीताला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

Story img Loader